चांगली बातमी! देशात विक्रमी 'जीएसटी' वसुली; जून महिन्यात झाले 'इतके' संकलन

वाढत्या जीएसटी संकलनावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala sitharaman) यांनी भाष्य केलं आहे. आता जीएसटी संकलन हे १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असेल असे त्यांनी सांगितले आहे.
GST collection
GST collection Saam Tv

नवी दिल्ली : भारतात या वर्षीच्या जून महिन्यात १.४४ लाख कोटी रुपयांचा जीएसटी संकलन झाला आहे. जून महिन्यातील हा जीएसटी संकलन वार्षिक आधारावर इतर महिन्यांच्या तुलनेत ५६ टक्के अधिक आहे. गेल्या महिन्यातील मे महिन्यात एकूण जीएसटी १,४०,८८५ कोटी संकलन झाला होता. जो वार्षिक आधारावर आधीच्या इतर महिन्यांच्या तुलनेत ४४ टक्के अधिक होता. या वाढत्या जीएसटी संकलनावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala sitharaman) यांनी भाष्य केलं आहे. आता जीएसटी संकलन या पुढे हे १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होईल, असे त्यांनी सांगितले आहे. ( GST Collection June 2022 News In Marathi )

GST collection
यात्रीगण कृपया ध्यान दे! रेल्वेने रद्द केल्यात 101 ट्रेन; प्रवास करण्यापूर्वी रद्द गाड्यांची यादी तपासा

आज जीएसटी लागू होऊन पाच वर्ष झाली. २०१७ साली वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यात आला. जीएसटी लागू झाल्यानंतर छोटे-छोटे कर रद्द करण्यात आले. जून महिन्यात एकूण जीएसटी संकलन २५, ३०६ कोटी रुपये आणि सीजीएसटी ३२,४०६ कोटी रुपयांचा सामावेश आहे. तर आयजीएसटी संकलन ७५,८८७ कोटी रुपये असून त्यातील ४०,१०२ कोटी रुपये हे आयात केलेल्या वस्तूमधील आहे. सेस संकलन हे ११,०१८ कोटी रुपये आहे.

पाचव्यांदा जीएसटी १.४० लाख कोटींच्या पार

दरम्यान, जीएसटी लागू झाल्यावर पाचव्यांदा मासिक जीएसटी कर संकलन हे १.४० लाख कोटींच्या पार गेला आहे. याआधी एप्रिल २०२२ मध्ये १,६७,५४० कोटी , मार्च २०२२ मध्ये १,४२, ०९५ कोटी रुपये , जानेवारी २०२२ मध्ये १,४०,९८६ कोटी रुपये, मे २०२२ मध्ये १,४०,८८५ कोटी रुपयांचे संकलन झाले होते.

GST collection
मोठा दिलासा! कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या नवीन दर

दरम्यान, भारतात वस्तू आणि सेवा कर लागून होऊन पाच वर्ष झाले आहे. जीएसटी संकलन महिन्याला १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होत आहे .वस्तू आणि सेवा करामध्ये उत्पादन शुल्क, सेवा कर आणि वॅट सारखे १७ कर आणि १३ उपकरांचा सामावेश करण्यात आला आहे . जीएसटी कर १ जुलै २०१७ तारखेच्या मध्यरात्रीपासून लागू झाला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com