
Gujarat Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरात विधानसभेसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरूवात होणार असून नागरिकांना संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी हे मतदान पार पडणार असून यासाठी तब्बल ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. (Latest Marathi News)
यंदाच्या निवडणुकीत भाजपा, काँग्रेससह आम आदमी पक्षही सर्व ताकदीनिशी उतरला आहे. त्यामुळे येथील निवडणूक भाजपाला तितकी सोपी नाही, म्हणूनच गुजरातमध्ये (Gujarat Election) भाजपाने फौज उतरवली आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण मांडून आहेत. गुजरात विधानसभेमध्ये एकूण १८२ जागा आहेत.
यातील पहिल्या टप्प्यात भाजप (BJP) आणि काँग्रेस सर्व ८९ जागांवर लढत आहेत. आम आदमी पक्षाने ८८ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पक्षानेही ५७ उमेदवारांना तिकीट दिले आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एआयएमआयएमने पहिल्या टप्प्यात केवळ ६ उमेदवार उभे केले आहेत.
मागच्या वेळी म्हणजेच २०१७ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत भाजपने तब्बल ९९ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. भाजपपाठोपाठ काँग्रेस पक्षाने ८० जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं असलं, तरी काँग्रेसनं कडवी झुंज दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये गेल्या २५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मात्र, यावेळी गुजरात विधानसभा काबिज करण्यासाठी काँग्रेससह अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने चांगलीच कंबर कसली आहे. त्यामुळे यंदाही भाजप सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्ताचं ठरणार आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.