Gujarat Accident : बाईक-कारची जोरदार धडक; पत्नी थोडक्यात बचावली, पतीला १२ किमी फरफटत नेलं

कारची दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक, 12 KM फरपटत नेले; तरुणच दुर्दैवी मृत्यू
Kerala Accident News
Kerala Accident News saam tv

Gujarat Accident News : दिल्लीच्या कांझावालासारखीच एक घटना गुजरात येथील सुरतमध्ये घडली आहे. येथे बाईक आणि कारची जोरदार धडक झाली. यानंतर कार चालकाने दुचाकीस्वाराला तब्बल 12 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. सागर पाटील असे या तरुणीचे नाव आहे.

Kerala Accident News
BMC News : मुंबईकरांनो ! चार फेब्रुवारीपर्यंत निम्म्या शहराला पाणी पुरवठा हाेणार नाही; जाणून घ्या भाग

हे हिट अँड रनचे प्रकरण 18 जानेवारीच्या रात्रीचे आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, सागर पाटील हा आपल्या पत्नीसह सुरत येथील कडोदरा-बार्डोली रस्त्यावर दुचाकीवरून जात होता. तेव्हा एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराची पत्नी रस्त्यावर पडली. तर सागर कारमध्ये अडकला.

कारचालकाने कोणतेही दयामया न दाखवता सागरला तब्बल 12 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. तर सागरची पत्नी रस्त्यावर पडली आणि बेशुद्ध झाली. महिलेला शुद्धीवर आल्यावर तिने दावा केला की, अपघातानंतर (Accident) दुचाकी चालवणारा तिचा नवरा बेपत्ता आहे.

Kerala Accident News
Bollywood Celebrity In Pathaan Review: चाहत्यांप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रिटींनाही शाहरुखच्या 'पठान'ची भुरळ...

पोलीस घटसथळी पोहोचले तेव्हा सागर अपघातस्थळी नव्हता. त्यानंतर पोलिसांना सागरचा मृतदेह 12 किमी अंतरावर सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांनी संपूर्ण चौकशी केली. परंतू त्यांना जवळपास कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा दिसून आला नाही.

त्यामुळे आरोपीचा शोध अद्याप लागलेला नाही. घटनेच्या दोन दिवसांनंतर या प्रकरणात एक तरूण समोर आला आहे. त्याने पोलिसांना व्हिडिओ दाखविला. त्याआधारे पोलिसांनी आरोपीच्या घराचा शोध घेतला. आणि व्हिडिओमधील कार असल्याचे समोर आले. परंतू कारचालक अद्याप फरार झालेला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com