Crime News : मुलीचा अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल केला; तरुणाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या BSF जवानाची हत्या

मेलजीभाई वाघेला असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. वाघेला हे बीएसएफ 56 मेहसाणामध्ये कर्तव्यास होते.
Gujarat Crime News
Gujarat Crime NewsSaam TV

Gujarat Crime News : मुलीचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करणाऱ्या तरुणाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या बीएसएफ जवानाला सात जणांनी मिळून बेदम मारहाण केली. या मारहाणीत जवानाचा जागीच मृत्यू झाला. ही संतापजनक घटना गुजरातमधील वणीपुरामा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Gujarat Crime News
Palghar Crime : कारवाई टाळण्यासाठी मागितली २ लाखांची लाच; महावितरणचे दोन वरिष्ठ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

मेलजीभाई वाघेला असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. वाघेला हे बीएसएफ 56 मेहसाणामध्ये कर्तव्यास होते. मिळालेल्या माहितीनुसार, नडियाद तालुक्यातील वाणीपुरा गावातील शैलेश उर्फ ​​सुनील जाधव याने काही दिवसांपूर्वी बीएसएफ जवान मेलजीभाई वाघेला यांच्या मुलीचा अश्लिल व्हिडिओ बनवून  (Crime News) तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

या प्रकरणाबाबत बीएसएफ जवान मेलजीभाई, त्यांचा मुलगा आणि इतर नातेवाईक शैलेशच्या घरी पोहोचले आणि कुटुंबाची खरडपट्टी काढली. त्यावेळी शैलेश घरी नव्हता. तुम्ही मुलाची बदनामी करत आहात, असे आरोपीच्या कुटुंबीयांनी जवानाला सांगितले.

Gujarat Crime News
Girls Fight : मॉलबाहेर तरुणींमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी; एकमेकींवर पार तुटून पडल्या लोकं फक्त बघत राहिली

यादरम्यान आरोपी तरुणाच्या नातेवाईकांनी मेलजीभाई यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर लाठ्या-काठ्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेत मेलजीभाई यांचा जागीच मृत्यू झाला. यादरम्यान त्यांचा मुलगाही गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले.

याप्रकरणी मेलजीभाई यांच्या पत्नी पत्नी मंजुलाबेन यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सात जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या घटनेनंतर परिसरातून संतापज व्यक्त केला जात आहे. बीएसएफ जवानाच्या पश्चात पत्नी, 3 मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com