
Gujarat News: गुजरातमधील सुरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेवर बलात्कार आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा पीडितेचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)
त्याने आपल्या प्रेयसीला आधी वायरने मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर हा नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने प्रेयसीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पूड टाकली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
निकुंज कुमार अमृत भाई पटेल असे आरोपीचे नाव असून तो सुरतचा रहिवासी आहे. निकुंज कुमार हा विवाहित असून त्याची पत्नी दुसऱ्या गावात वेगळी राहत असल्याची वस्तुस्थिती लपवून ठेवली. आरोपीनं पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून आपल्या जाळ्यात अडकवले. पण आरोपीचं बिंग फुटल्यानंतर दोघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. यानंतर पीडित तरुणीने प्रेमसंबंध तोडण्याचा निर्णय घेतला.
तिच्या या निर्णयामुळे संतप्त झालेल्या पटेलने तिला केबल वायरने मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर त्याने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरचीपूड टाकली. तसेच तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral) करण्याचीही धमकी दिली. या संतापजनक घटनेनंतर गंभीर दुखापत झालेल्या तरुणीला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. (Gujarat News)
याप्रकरणी ओलपाड पोलीस (Police) ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.