Gujarat Assembly Election : पंतप्रधान मोदींच्या रॅलींना आजपासून सुरुवात; २५ जाहीर सभांना संबोधित करणार

गुजरात निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान राज्यभरात एकूण 25 सभा घेणार आहेत.
PM Modi
PM ModiSaam Tv

Gujarat Assembly Elections: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. गुजरात निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यभरात एकूण 25 सभा घेणार आहेत. पंतप्रधानांच्या रॅलीचे नियोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले असून, त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 नोव्हेंबर रोजी सौराष्ट्र दौऱ्यावर जाणार असून तेथे ते वेरावळ, धोराजी, अमरेली आणि बोटाडला भेट देणार आहेत. या ठिकाणी पंतप्रधान मोदी जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. यंदा देखील गुजरातमध्ये (Gujarat) सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चबांधणीला सुरुवात झाली आहे.

PM Modi
Buldhana Accident : मद्यधुंद अवस्थेत पोलीस कर्मचाऱ्याचे गाडीवरील नियंत्रण सुटलं; 3 वाहनांना धडक

वलसाड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते आणि संघटनेने आज पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विशेष तयारी केली आहे. वलसाडच्या पारडी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कनू देसाई यांनी आज होणाऱ्या रोड शोच्या मार्गाची पाहणी केली. त्याचबरोबर पीएम मोदींच्या रोड शोबाबत सुरक्षा व्यवस्थेवरही विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. पीएम मोदींच्या सुरक्षेसाठी 9 एसपी, 17 डीएसपी, 40 पीआय, 90 पीएसआय यांच्यासह 15000 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.

४० स्टार प्रचारकांची नावे...

गुजरात निवडणुकीच्या प्रचारात भाजप कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. पीएम मोदींव्यतिरिक्त पक्षाने ४० स्टार प्रचारकांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी (Nitin Gadkari), स्मृती इराणी, शिवराज सिंह, निरहुआ, रवी किशन, मनोज तिवारी, हेमा मालिनी, परेश रावल, विजय रुपाणी, नितीन पटेल यांच्या नावांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही या यादीत समावेश आहे.

दोन टप्प्यात मतदान

गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान (Voting) होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी येत्या १ आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. गुजरातमध्ये ईशुदान गढवी 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत.

आत्तापर्यंत गुजरात विधानसभा निवडणूकीत भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) सामना होत आला आहे. मात्र, यंदाच्या निवडणूकीत गुजरातमध्ये पहिल्यांदाच आम आदमी (AAP) पक्षही मैदानात उतरला आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक वेळापत्रक

पहिल्या टप्प्यासाठी 5 नोव्हेंबरला अधिसूचना जारी होणार

दुसऱ्या टप्प्यासाठी 10 नोव्हेंबरला अधिसूचना जारी होणार

अर्ज छाननी

पहिला टप्पा: 15 नोव्हेंबर

दुसरा टप्पा:18 नोव्हेंबर

अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख

पहिला टप्पा: 17 नोव्हेंबर

दुसरा टप्पा: 21 नोव्हेंबर

किती टप्प्यात पार पडणार मतदान: दोन टप्प्यात निवडणूक

पहिला टप्पा: 1 डिसेंबर

दुसरा टप्पा: 5 डिसेंबर

मतमोजणीची तारीख: 8 डिसेंबर

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com