Gujarat Breaking: भुपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री
Gujrat Breaking: भुपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री

Gujarat Breaking: भुपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला

भाजपा नेते विजय रुपाणी यांनी काल (11 सप्टेंबर) गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यानंतर आता घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार भुपेंद्र पटेल यांची गुजरातचे नवे मुख्यमंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भूपेंद्र पटेल गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री असतील. गांधीनगर मधील भाजप कार्यालायात भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून सर्वांनी एकमत दिले. भूपेंद्र पटेल माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात. अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचं सभापती म्हणूनही भूपेंद्र पटेल यांनी काम पाहिलं आहे. 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भूपेंद्र पटेल अहमदाबादच्या घाटलोडिया येथून एक लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी झाले होते. भूपेंद्र पटेल यांना "दादा" म्हणूनही ओळखले जाते.

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासमोर आता नवीन आव्हान उभी राहणार आहेत. गेल्या दोन दशकांपासून गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आहे. मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं भाजपासमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. तर नुकत्याच झालेल्या काही सर्वेंमधून गुजरातमध्ये सत्ता बदलाचे वारे वाहू लागल्याची चिन्हे दिसत आहेत.

अशा परिस्थितीत मुख्यमंत्री भुपेंद्र पटले यांच्यासमोर गुजरातमध्ये भाजपाची सत्ता राखण्याचं मोठ आव्हान आहे. मात्र तेही गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com