लाऊडस्पीकर आरती लावण्याने तुंबळ हाणामारी; तरुणाची हत्या

Gujrat Crime : लाऊडस्पीकरच्या वादावरून गुजरातमध्ये घडलेली ही आठवडाभरातील दुसरी घटना आहे.
Gujrat Crime News in Marathi , Gujrat Latest News in Marathi
Gujrat Crime News in Marathi , Gujrat Latest News in MarathiSaam Tv

अहमदाबाद: सध्या महाराष्ट्रात (Maharastra) भोंग्यावरून राजकारण तापलं असतानाच, गुजरातमधील मेहसाणा (Gujrart Mehsana) येथे एका धक्कादायक घटना घडली आहे. एका मंदिरात लाऊडस्पीकर (Loudspeaker) वाजवला म्हणून 42 वर्षीय व्यक्तीला ६ जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत पीडित व्यक्ती हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. लाऊडस्पीकरच्या वादावरून गुजरातमध्ये घडलेली ही आठवडाभरातील दुसरी घटना आहे. (Gujrat Crime News in Marathi)

Gujrat Crime News in Marathi , Gujrat Latest News in Marathi
अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर हा मूलभूत अधिकार नाही; हायकोर्टाची टिप्पणी

मेहसाणा जिल्ह्यातल्या जोतना तालुक्यातील लक्ष्मीपुरा गावात ही घटना घडली. जयवंतजी ठाकोर (वय ४२) असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत जसवंतजी ठाकोर हे रोजंदारी मजूर होते. बुधवारी शेतातून आल्यानंतर ते सायंकाळी ७ वाजता त्यांचा मोठा भाऊ अजित ठाकोर यांच्यासोबत मेलडी माता मंदिरात देवीची आरती करत होते. यावेळी त्यांनी लाऊडस्पीकरवर आरती लावली होती.

दरम्यान, आरती सुरू असताना सदाजी ठाकोर, विष्णूजी ठाकोर, बाबूजी ठाकोर, जयंतीजी ठाकोर, जवनजी ठाकोर, विनुजी ठाकोर हे तेथे आले आणि तुम्ही एवढ्या मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर का वाजवत आहात? असं म्हणत त्यांनी वाद घालण्यास सुरूवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, या वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. आरोपींनी जसवंतजी ठाकोर आणि त्यांच्या मोठा भाऊ अजित यांना लाठ्या-बुक्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले.

हा प्रकार लक्षात येताच गावातील काही नागरिकांनी एकत्र येत दोनही भावांना मेहसाणा येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना जसवंतजी ठाकोर यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जयवंतजी यांचा मोठा भाऊ अजित यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून मेहसाणा पोलिसांनी ६ जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी २ मे रोजी अहमदाबाद जिल्ह्यातील बावळा तालुक्यात एका मंदिरात लाऊडस्पीकर वाजवल्याबद्दल ३० वर्षीय भरत राठोड नामक व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत भरतचा मृत्यू झाला होता.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com