Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी केला मोरबी पूल दुर्घटनास्थळाचा दौरा; रुग्णालयात केली जखमींचीही विचारपूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील मोरबी दौऱ्यावर आहेत. रविवारी सायंकाळी मच्छू नदीच्या किनाऱ्यावरील केबल पूल कोसळला.
narendra modi
narendra modi saam tv

Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील मोरबी दौऱ्यावर आहेत. रविवारी सायंकाळी मच्छू नदीच्या (River) किनाऱ्यावरील केबल पूल कोसळला. या दुर्घटनेत १३५ लोकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दुर्घटनास्थाचा दौरा केला. त्यानंतर मोदी यांनी रुग्णालयात जाऊन दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. तसेच नरेंद्र मोदी यांनी रेस्क्यू ऑपरेशनचा आढावा घेतला.

गुजरातच्या मोरबी दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनास्थळी एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय हवाई दल, नौदलाच्या पथकासोबत स्थानिकाकडून शोधकार्य सुरू आहे. या आधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरबी दुर्घटनास्थळाचा दुरध्वनीवरून आढावा घेतला. तसेच मुख्यमंत्री आणि स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. मोरबी पूल दुर्घटनेतील जखमींना योग्य ती मदत करण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

narendra modi
MNS News: ओडिशाप्रमाणे कंत्राटी कामगार पद्धत बंद करुन कामगारांना कायमस्वरुपी कामावर घ्या; मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दुर्घटनेनंतर मोदींनी साधला होता गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क

रविवारी ३० ऑक्टोबर रोजी मोरबी पूलाच्या दुर्घटनेनंतर पंतप्रधान सहाय्यता निधीतून पीडितांना मदत करण्यात आली. पंतप्रधान कार्यालयातून ट्विट करत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर करण्यात आली. तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. दुर्घटनेनंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि अन्य अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com