Gurugram News : महिलेने मुलासह स्वत:ला 3 वर्ष घेतलं कोंडून, पतीलाही नव्हता घरात प्रवेश; कारण वाचून बसेल धक्का

हा धक्कादायक प्रकार गुरुग्राम येथील मारुती कुंज भागात उघडकीस आला.
Gurugram News
Gurugram NewsTwitter/@ANI

Latest Gurugram News : कोरोना महामारीची भीती आता कमी झाली आहे. मात्र कोरोना महामारीच्या दहशतीचे आणखी एक धक्कादायक उदाहरण गुरुग्राम येथून समोर आले आहे. गुरुग्राममध्ये एका महिलेने करोनाची एवढी धास्ती घेतली की तिने स्वतःच्या १० वर्षीय मुलासह स्वतःला तब्बल तीन वर्षे एक खोलीत कोंडून घेतलं होतं. हा धक्कादायक प्रकार गुरुग्राम येथील मारुती कुंज भागात उघडकीस आला.

Gurugram News
UP News : भयानक! डीजेच्या डान्सवरून लग्नमंडपातच वऱ्हाडी मंडळी एकमेकांशी भिडले; एकाचा मृत्यू

याबाबत महिलेच्या पतीने जिल्हा प्रशासनाला माहिती दिली. यानंतर मंगळवारी (२१ फेब्रुवारी) सायंकाळी जिल्हा प्रशासनाच्या पथकाने आई आणि मुलाची सुटका केली. त्यानंतर या दोघांना गुरुग्राम येथील शासकीय रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं आहे.

कोविडच्या (Corona) भीतीमुळे आई आणि तिच्या दहा वर्षांच्या मुलाने तीन वर्षांपासून सूर्यप्रकाशही पाहिलेला नाही. तीन वर्षांपासून साचलेला कचरा त्यांच्या खोलीत विखुरलेला होता. बाहेर आल्यावर तिला कोविड होईल याची भीती अजूनही त्या महिलेला वाटत होती.

पतीलाही घरात प्रवेश नव्हता

सध्या मुलाचे वय 10 वर्षे असून त्याची आई 40 वर्षांची आहे. ही महिला कोरोनामुळे खूपच घाबरली होती. जेव्हा 2020 मध्ये पहिल्यांदा निर्बंध शिथिल करण्यात आले, तेव्हा या महिलेचा पती कामासाठी घराबाहेर पडला होता, मात्र तेव्हापासून या महिलेने आपल्या पतीलाही घरात प्रवेश दिला नव्हता. यानंतर महिलेचा पती गेल्या दीड वर्षांपासून चाकरपूर येथे भाड्याच्या खोलीत राहू लागला.व्हिडीओ कॉलद्वारे ते आपल्या पत्नी आणि मुलाच्या संपर्कात राहत होते आणि त्या दोघांच्या सर्व गरजा भागवत होते.

Gurugram News
Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर? भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली!

'पत्नीचे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ'

पत्नीच्या वागण्यावरून पत्नी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे पतीला समजले होते. या प्रकरणी तो पोलिसांकडे गेला, मात्र पोलिसांनी ही घरगुती बाब असल्याचे सांगून कोणतीही चौकशी केली नाही. यानंतर त्यांनी रविवारी पुन्हा चाकरपूर चौकी गाठली. परवीन नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने चौकीत त्याचे म्हणणे ऐकून घेतले आणि पीडित मुलाशी व्हिडिओ कॉलवर बोलले तेव्हा ते चक्रावून गेले.

तीन वर्षांपर्यंत इंडक्शनवर बनवलेले अन्न

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, महिलेच्या घरातील सिलिंडर संपल्याने तिने इंडक्शनवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. तीन वर्षे तिने स्वतःसाठी आणि मुलासाठी असाच स्वयंपाक केला. या काळात पतीने घर भाडे, मुलाच्या शाळेचे शुल्कही नियमित भरले. पत्नी व मुलासाठी किराणा सामान, भाजी इत्यादी वस्तू दरवाज्या बाहेर ठेवून जात असे. मुलगा ऑनलाइन शिक्षण घेत होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com