आधी लग्न केलं, मग घटस्पोट घेतला, नंतर पुन्हा मैत्री अन् केलं दुष्कृत्य

दोन वर्षे वेगळे राहिल्यानंतर शाहीन खानने तिच्याशी बोलणे सुरू केले आणि त्यांची मैत्री झाली.
आधी लग्न केलं, मग घटस्पोट घेतला, नंतर पुन्हा मैत्री अन् केलं दुष्कृत्य
आधी लग्न केलं, मग घटस्पोट घेतला, नंतर पुन्हा मैत्री अन् केलं दुष्कृत्यSaam TV

लग्नानंतर सात वर्षे एकत्र राहिल्यानंतर पतीने घटस्फोट घेतला आणि दोघे वेगळे झाले. दोन वर्षे वेगळे राहिल्यानंतर पतीने पुन्हा मैत्री करून हॉटेलमध्ये भेटायला बोलावले आणि चुकीचे कृत्य करून तिचे फोटो-व्हिडीओ व्हायरल केले. ही घटना मोहना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. हे फोटो-व्हिडिओ व्हायरल होताच पीडितेने पोलिस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे की, तिचा विवाह शिवपुरी येथील एका तरुणाशी 2008 साली झाला होता. लग्नानंतर ते 2015 पर्यंत सात वर्षे एकत्र राहिले, मात्र त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला आणि दोघांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून पीडिता तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती.

आधी लग्न केलं, मग घटस्पोट घेतला, नंतर पुन्हा मैत्री अन् केलं दुष्कृत्य
डेहराडूनमध्ये आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 8 महिलांसह 11 जणांना अटक

दोन वर्षांनी पुन्हा मैत्री

दोन वर्षे वेगळे राहिल्यानंतर शाहीन खानने तिच्याशी बोलणे सुरू केले आणि त्यांची मैत्री झाली. एके दिवशी शाहीनने तिला पडव पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल सूर्या येथे भेटण्यासाठी बोलावले आणि जेव्हा ती येथे आली तेव्हा त्याने तिला धमकावले आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ बनवले.

सोशल मीडियावर व्हायरल

काही दिवसांपूर्वी पीडितेच्या लग्न दुसऱ्या तरुणासोबत होणार असताना आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले. हा प्रकार तिला समजताच तिने पोलीस ठाणे गाठले आणि या प्रकरणाची तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com