मुसळधार पावसामुळे घर कोसळून 9 जणांचा मृत्यू

मृतांमध्ये 4 चार महिला, 4 मुले आणि एका पुरुषाचा समावेश
मुसळधार पावसामुळे घर कोसळून 9 जणांचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे घर कोसळून 9 जणांचा मृत्यूtwitter

चेन्नई: दक्षिणेकडील तामिळनाडू (Tamil Nadu)राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. यातच मुसळधार पावसामुळे (Rain) पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. वेल्लोर शहरात सकाळी एक घर कोसळून यात 9 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर उघडकीस आली आहे. मृतांमध्ये 4 चार महिला, 4 मुले आणि एका पुरुषाचा समावेश आहे. इतर 8 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून पुढील औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. घराच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com