
उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. शहरातील अनेक ठिकाणी पाणी तुंबलंय. लखनौ, मुरादाबाद, संभलसह अनेक जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालंय. या मुसळधार पावसासह अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत. विविध घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती शासकिय अधिकाऱ्यांकडून देण्यात आलीय.
रविवारी उशिरा रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसानं लखनौ, कानपूर, उन्नाव, बाराबंकी, हरदोई, बहराइच, सीतापूरमध्ये जोरदार पाऊस झाला. अनेक दुकान, घरांमध्ये पाणी तुंबल्याची घटना घडलीय. रेल्वे ट्रक आणि विमानतळामध्ये पाणी साचलंय. दरम्यान हवामान विभागानं १४ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. तसेच १६ सप्टेंबरपर्यंत तराई पट्टा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांसह पूर्व उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. (Latest News on Rain)
सुलतानपूर, रायबरेली, अमेठी, अयोध्या आणि आंबेडकर नगरमध्ये आज मुसळधार पाऊस होईल असा इशाराही हवामान विभागानं दिलाय. भारतीय हवामान विभागानं उत्तर प्रदेशातील ३१ जिल्ह्यांमध्ये पुढील ७ दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झालीय. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यामधील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आली आहेत.
पावसाची स्थिती पाहता मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी सतर्क राहण्याचं आदेश दिलेत. ज्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे. तेथील जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचं आदेश देण्यात आलेत. तसेच बचाव कार्यावर नजर ठेवावी. तसेच पावसामुळे बाधित झालेल्या लोकांना आर्थिक मदत त्वरीत द्यावी. पाणी तुंबलेले पाणी निचरा करण्याची व्यवस्था करावी. नद्यांच्या पाण्याच्या पातळीचे सतत निरीक्षण करा, असे आदेश मुख्यमंत्री योगींनी दिलेत.
मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झालंय. त्या पीक नुकसानीचा पंचनामा करून त्याचे अहवाल लवकर तयार करावीत. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांना नियमानुसार आर्थिक मदत मिळवून द्या. उन्नाव येथे वीज पडून काही जनावरे मृत्यूमुखी पडले आहेत, याची दखल घेत मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी पशुपालकांना त्वरीत मदत देण्याचे आदेश दिलेत. प्रती मेंढी चार हजार रुपयांची मदत देण्याची निर्देश जिल्हा प्रशासनाला योगींनी दिलेत.
उत्तर प्रदेशातील पावसाच्या स्थितीबाबत माहिती देताना, मदत आयुक्त जीएस नवीन कुमार म्हणाले की, राज्यात कुठेही चिंतेची परिस्थिती नाही. गेल्या २४ तासामध्ये उत्तर प्रदेशात सरासरी ३१.८ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा ६.४ मिमी आणि ४९७ टक्के जास्त आहे. राज्यात १ जून २०२३ पासून आतापर्यंत ५७७.४ मिमी पाऊस झाला आहे. जो सरासरी ६६५.२ मिमी पावसाच्या ८७ टक्के आहे. दरम्यान गेल्या २४ तासात राज्यातील २५ जिल्ह्यात ३० मिमी आणि त्याहून अधिक पावसाची नोंद झालीय. मात्र कोणतीही नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत नाहीये. दहा जिल्ह्यातील १६८ गावांना पुराचा फटका बसलाय.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.