Fathers Day : ५००० बियर्स Free मिळणार? Whatsapp वर व्हायरल मेसेजचं सत्य काय?

Fathers Day Beer Scam : यासोबतच लोकांना त्यांच्या ओळखीतल्या २० अन्य लोकांना हा मेसेज फॉरवर्ड करायला सांगितले जाते.
Warnings issued over fake WhatsApp Heineken Beer Scam Father's Day
Warnings issued over fake WhatsApp Heineken Beer Scam Father's DaySaam Tv

Father’s Day 2022: फादर्स डे जगभरात जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यावेळी १९ जूनला फादर्स डे साजरा केला जाणार आहे. फादर्स डे (Fathers's Day 2022) चा फायदा घेत आता ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud) करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यानुसार व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) व्हायरल होत असलेल्या मेसेजबाबत युजर्सना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या मेसेजमध्ये बिअरचे मोफत क्रेट जिंकण्याची ऑफर (heineken beer father's day contest 2022) दिली जात आहे. मात्र त्यातून मोफत बिअर मिळण्याऐवजी लोकांची वैयक्तिक माहिती चोरली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'हाइनिकेन बिअर फादर्स डे कॉन्टेस्ट 2022' च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या वडिलांसाठी बिअरच्या ५००० बाटल्या जिंकू शकता, असे या व्हायरल मेसेजमधून सांगण्यात आले आहे. (Heineken says there’s no free beer, warns of phishing scam)

हे देखील पाहा -

सर्व वैयक्तिक माहिती चोरली जाणार

या व्हायरल मेसेजमध्ये बिअरच्या बाटल्यांनी भरलेल्या क्रेटचे चित्र आहे आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वेबसाइटची लिंक खाली दिली आहे. जरी हा संदेश खूप मोठ्या घोटाळ्याचा भाग आहे. ऑनलाइन फसवणूकीची माहिती उघड करणारी वेबसाइट OnlineAlerts ने वापरकर्त्यांना या लिंकवर अजिबात क्लिक करू नका, असा इशारा दिला आहे, कारण असे केल्याने तुमच्यासमोर एक फिशिंग वेबसाइट उघडेल, ज्याद्वारे तुमची सर्व वैयक्तिक माहिती चोरली जाणार आहे.

हाइनिकेन कंपनीनेही केलं सावध

बियर कपंनी हाइनिकेन यांनीही या व्हायरल होत असलेल्या फेक मेसेजबद्दल ग्राहकांना सावध केले आहे. हा खोटेपणा असून आपल्या कंपनीने फ्री बियरसाठी अशी कोणतीही 'स्पर्धा' सुरू केली नसल्याचे स्पष्टीकरणही कंपनीकडून देण्यात आले आहे. ट्विटरवर एका प्रश्नाला उत्तर देताना कंपनीने लिहिले आहे की, 'हा घोटाळा आहे. हे आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. कृपया या लिंकवर अजिबात क्लिक करू नका किंवा इतरांना फॉरवर्ड करू नका. खूप धन्यवाद.'

Warnings issued over fake WhatsApp Heineken Beer Scam Father's Day
Bye Bye Sir! तीन शब्दांत दिला राजीनामा; वाचून हसू आवरणार नाही!

अशी होतेय लोकांची फसवणूक

सर्वप्रथम आपल्याला आपल्या व्हॉट्सअॅपवर 'हाइनिकेन बिअर फादर्स डे कॉन्टेस्ट 2022' अशा नावाचा मेसेज येतो. या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करताच एक वेबसाइट उघडते. यामध्ये, आपली वैयक्तिक माहिती आणि खात्याची ओळखपत्रे भरण्याबरोबरच, लोकांना काही नको असलेल्या सेवांसाठीही त्यांच्याकडून सबस्क्रीप्शन करवून घेतले जाते. यासोबतच लोकांना त्यांच्या ओळखीतल्या २० अन्य लोकांना हा मेसेज फॉरवर्ड करायला सांगितले जाते. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांना तुमची सर्व वैयक्तिक माहिती मिळते आणि त्याचवेळी त्यांचा हा फेक मेसेज आणि घोटाळा हा आणखी २० लोकांपर्यंत पोहोचतो. 'हाइनिकेनच्या नावावर अशी फसवणूक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही २०१८ आणि २०२० मध्ये देखील लोकांना व्हॉट्सअॅपवर असेच मेसेज आले होते, ज्यामध्ये अशीच फ्री बिअर ऑफर करण्यात आली होती. त्यानंतर हा मेसेज केवळ व्हॉट्सअॅपवरच नाही, तर ट्विटर आणि फेसबुकवरही मोठ्या प्रमाणात पसरला होता.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com