
Hero Splendor 125cc XTEC: दिग्गज दुचाकी कंपनी Hero MotoCorp ची सर्वाधिक विकली जाणारी बाइक हीरो स्प्लेंडर आता नव्या रुपात ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे. हीरो स्प्लेंडर ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी दुचाकी आहे. त्यामुळे कंपनी सतत तिचे मॉडेल अपग्रेड करत राहते.
आतापर्यंत हिरो आपल्या 100cc बाईक फक्त XTEC प्रकारात विकत होती. मात्र हिरोने आता 125cc सुपर स्प्लेंडर XTEC आवृत्तीमध्ये लॉन्च केली आहे. Hero Super Splendor ही बाईक XTEC व्हर्जनमध्ये लॉन्च केली आहे. Hero Super Splendor XTEC ला Passion XTEC वर प्लेस करण्यात आले आहे. कंपनीने या बाईकच्या ड्रम ब्रेक व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 83,368 रुपये आणि डिस्क ब्रेक व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 87,268 रुपये ठेवली आहे.
इंजिन आणि मायलेज
या बाईच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर या बाईकमध्ये 124.7 cc चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7500 RPM वर 10.7 bhp पॉवर आणि 6000 RPM वर 10.6 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईखचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. सुपर स्प्लेंडर 68 किमी/लीटर इंधन इकॉनॉमी देखील असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
काय काय आहेत फीचर्स?
Hero MotoCorp आपल्या सुपर स्प्लेंडरमधून ग्राहकांना 'सुपर' पॉवर, मायलेज, आराम आणि स्टाईलच मिळेल असे वचन देते. या बाईकमध्ये फुली-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल सारख्या फीटर्ससह कनेक्टिव्हिटी फीचर जोडले आहे. यामध्ये पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर, लो फ्यूल वॉर्निंग, सर्व्हिस रिमाइंडर, मालफंक्शन इंडिकेटर यांसारख्या फिचर्संचा समावेश आहे. याशिवाय XTEC सूटसह कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये ब्लूटूथ पेअरिंग, कॉल अॅलर्ट आणि एसएमएस अलर्ट या सुविधा देखील मिळणार आहेत.
आकर्षक डिझाइन
Hero Splendor 125cc XTEC मध्ये LED हेडलॅम्प, LED पोझिशन लॅम्प आणि आकर्षक ग्राफिक्स देण्यात आले आहेत. या बाईकच्या पुढील बाजूस ऑप्शनल डिस्क ब्रेक, रिअर ड्रम ब्रेक, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, ट्विन शॉक ऍब्जॉर्बर्स, अलॉय व्हील्स ब्लॅक फिनिश, रायडर ट्रँगल यांचा समावेश आहे. हीरोच्या या बाईकची स्पर्धा Honda च्या CB Shine 125 cc आणि TVS Raider शी करते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.