Asaduddin Owaisi: एक दिवस हिजाब घातलेली महिला पंतप्रधान बनेल', ओवेसींचं वक्तव्य; भाजपने विचारले...

पंतप्रधान सबका साथ, सबका विकास म्हणतात पण हे भाषणातले शब्द आहेत. जमिनीवर काहीतरी वेगळे घडत आहे असं म्हटलं.
Owesi
Owesi Saam TV

हैदराबाद : भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान बनताच भारतातील राजकारणात याचे पडसाद उमटू लागले आहेत. एकीकडे विरोधी पक्ष अल्पसंख्याक कार्डचा वापर करून राजकीय हल्ले करत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षालाही सूडबुद्धीने घेराव घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. एआयएमआयएमचे (MIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा हिजाब घातलेल्या महिलेने पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एक दिवस हिजाब घातलेली मुलगी देशाची पंतप्रधान व्हावी अशी माझी इच्छा आहे, असे ते म्हणाले.

Owesi
Bacchu Kadu : कोर्टात जाणार, शिंदे-फडणवीसांना नोटीस पाठवणार; बच्चू कडू काय म्हणाले, वाचा...

विजयपुरा येथे पत्रकारांशी ते बोलत होते. ऋषी सुनक ब्रिटनमध्ये पंतप्रधान बनण्याबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, मी जिवंत आहे किंवा माझ्या आयुष्यानंतर हिजाब घातलेली मुलगी भारताची पंतप्रधान बनेल. इतकंच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत दिल्लीत पंतप्रधान सबका साथ, सबका विकास म्हणतात पण हे भाषणातले शब्द आहेत. जमिनीवर काहीतरी वेगळे घडत आहे असं म्हटलं.

Owesi
'आमदार सांभाळणं सोप्प नाही; दोन महिन्यात शिंदे-फडणवीस सरकार उलटणार'

भाजपचा ओवेसींना सवाल

हिजाब घातलेली महिला पंतप्रधान होण्याच्या ओवेसींच्या वक्तव्याचा भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप नेते शहजाद पूनावाला म्हणाले की, ओवेसीजी आशा करतो की हिजाब असलेली महिला देशाची पंतप्रधान होईल. संविधान कोणाला थांबवत नाही पण हिजाब घातलेली मुलगी एआयएमआयएमची अध्यक्ष केव्हा होईल ते सांगा. यापासून सुरुवात करूया?"

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com