
चेन्नई: तामिळनाडूचे (tamil nadu) उच्च शिक्षणमंत्री पोनमुडी (minister ponmudi) यांनी हिंदी भाषं संदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळे त्यांच्यावर टीका होतं आहेत. भाषा म्हणून हिंदीपेक्षा इंग्रजी अधिक मौल्यवान आहे. त्यांनी यावेळी हिंदी भाषेची खिल्ली उडवली आहे. हिंदी भाषिक पाणीपुरी विकत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिंदी सक्तीऐवजी ऐच्छिक असावी, असंही पोनमुडी म्हणाले. यामुळे आता पुन्हा हिंदी भाषेवरुन वाद सुरु झाला आहे.
मंत्री पोनमुडी भरथियार विद्यापीठ कोईम्बतूर येथे आयोजित दीक्षांत समारंभात बोलत होते. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. या कार्यक्रमात तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी उपस्थित होते. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून शिकवली जात असताना हिंदी का शिकली पाहिजे असा सवालही (minister ponmudi) त्यांनी यावेळी केला.
कोईम्बतूरमध्ये हिंदी भाषिक पाणीपुरी विकतात, असंही उच्च शिक्षण मंत्री पोनमुडी म्हणाले. पोनमुडी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या फायदेशीर पैलूंची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. पण राज्य सरकार फक्त दोन-भाषा प्रणाली लागू करण्याचा निर्धार असल्याचा दावा केला. तामिळनाडूची शिक्षण व्यवस्था भारतातील सर्वोत्तम आणि प्रगत आहे. तमिळ विद्यार्थी कोणतीही भाषा शिकू शकतात, असंही ते म्हणाले. हिंदी भाषक सेवाचकरी, रस्त्याच्या कडेला पाणीपुरी विकणे यांसारखी छोटी-मोठी नोकरी करत आहेत. आता इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे, जी हिंदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे, असंही (minister ponmudi) ते म्हणाले.
Edited By- Santosh Kanmuse
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.