Temple Vandalised In Canada : कॅनडात हिंदू मंदिरात तोडफोड, समाजकंटकांनी भारताविरोधात ओकले विष

Hindu Temple Vandalised in Canada: कॅनडामध्ये भारतविरोधी कारवाया थांबण्याचे नाव घेत नाहीत. येथील हिंदू मंदिराला पुन्हा लक्ष्य करण्यात आले.
Hindu Temple Vandalised in Canada/Twitter/windsor police
Hindu Temple Vandalised in Canada/Twitter/windsor policeSAAM TV

Hindu Temple Vandalised in Canada: कॅनडामध्ये भारतविरोधी कारवाया थांबण्याचे नाव घेत नाहीत. येथील हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आले. काळे कपडे परिधान केलेले आणि तोंडावर मास्क लावून आलेल्या समाजकंटकांनी ओंटारियो येथील मंदिरात तोडफोड केली. मंदिराच्या भिंतीवर भारताविरोधात आक्षेपार्ह संदेश लिहिला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या प्रकरणी कॅनडातील विंडसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांकडून सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओही शेअर केला आहे. संशयित आरोपींनी केलेली तोडफोड व्हिडिओत स्पष्ट दिसते.

या संशयित आरोपींपैकी एक जण पहारा देत होता. तर त्यातील एकाने मंदिराच्या भिंतीवर स्प्रे पेंटिंग करून भारतविरोधी संदेश लिहिला.

Hindu Temple Vandalised in Canada/Twitter/windsor police
Taj Mahal : ताजमहाल प्रेमाचे प्रतीक नाही, ते पाडून टाका; भाजप आमदाराची पंतप्रधान मोदींना अजब मागणी

कॅनडामध्ये हिंदू मंदिरात अशा प्रकारे तोडफोड केल्याची चार महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. याआधी ब्रॅम्पटन येथे एका मंदिरात तोडफोड केली होती. याच वर्षी ३१ जानेवारीला घटना घडली होती. (Latest Marathi News)

Hindu Temple Vandalised in Canada/Twitter/windsor police
PM Narendra Modi Statement: 'बजरंगबलीप्रमाणे भाजपही शक्तीशाली होतोय', पीएम मोदी नेमकं काय म्हणाले, वाचा!

कॅनडामध्ये कधी मंदिरे तर कधी महात्मा गांधीजींच्या पुतळ्यांची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मार्चच्या अखेरच्या आठवड्यात बर्नबायमध्ये एका विद्यापीठाच्या आवारातील गांधीजींच्या पुतळ्याची तोडफोड केली होती. त्यावर भारताने तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला होता. काही दिवसांपूर्वी खलिस्तानी समर्थकांनीही भारतविरोधी घोषणा करून वाणिज्य दूतावासात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com