
SP Hinduja Death: हिंदुजा ग्रुपचे (Hinduja Group) चेअरमन श्रीचंद परमानंद हिंदुजा यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. चार हिंदुजा बंधूंमध्ये एसपी हिंदुजा हे सर्वात मोठे होते. लंडनमध्ये त्यांचं निधन झालं. हिंदुजा कुटुंबाने याबाबत माहिती दिली आहे.
हिंदुजा कुटुंबीयांनी याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, 'आज आमचे कुटुंबीय आणि हिंदुजा ग्रुपचे चेअरमन एसपी हिंदुजा यांचे निधन झाल्याची घोषणा करताना गोपीचंद, प्रकाश, अशोक आणि संपूर्ण हिंदुजा कुटुंबाला अतिशय दुःख होत आहे. (Latest Marathi News)
हिंदुजा ग्रुप हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यावसायिक घराण्यांपैकी एक आहे. १९७१ मध्ये परमानंद हिंदुजा यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी कौटुंबिक वारसा हाती घेतला. अशोक लेलँड, गल्फ ऑइल, हिंदुजा बँक स्वित्झर्लंड, इंडसइंड बँक, हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स, हिंदुजा टीएमटी, हिंदुजा व्हेंचर्स, इंडसइंड मीडिया आणि कम्युनिकेशन्स लिमिटेड या त्यांच्या प्रमुख कंपन्या आहेत.
८० च्या दशकात बोफोर्स घोटाळ्यात एसपी हिंदुजा यांचे नाव समोर आले होते. त्यावेळी असा आरोप करण्यात आला होता की, गांधी कुटुंबाशी जवळीक असल्यामुळे हिंदुजा बंधूंना स्वीडिश कंपनीच्या बाजूने करार करण्यास नियुक्त करण्यात आले होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.