आदर्शवत! ' इथं' अजान सुरू झाली की मंदिरावरील स्पीकर करतात बंद

मशिदीकडून रामनवमी दिवशी सरबतचे वाटप करण्यात येते. देशात एका बाजूला भोंग्यावरुन तेढ निर्माण होत असतानाच दुसरीकडे बंधुभावाचे आदर्शवत उदाहरण समोर आले आहे.
आदर्शवत! ' इथं' अजान सुरू झाली की मंदिरावरील स्पीकर करतात बंद
hindus and muslims set the example of brotherhood in patnaSaam Tv

पटना: देशात सध्या मशिदीवरील भोंग्यावरुन गोंधळ सुरु आहे. उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याच्या कारवाया सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर बिहारमधील (Bihar) पटना येथे दोन्ही सामाजातील बंधुभावाचे उदाहरण पाहायला मिळात आहे. येथे अजान सुरु असताना महावीर मंदिरातील लाऊडस्पीकर (Loudspeaker) बंद केले जातात. तर महावीर मंदिरात भजन- किर्तनावेळी कोणतीही अडचण येऊ देत नाहीत. महावीर मंदिर आणि मशिदीमध्ये फक्त ५० मीटरचे अंतर आहे. मशिदीकडून रामनवमी दिवशी सरबतचे वाटप करण्यात येते. देशात एका बाजूला भोंग्यावरुन तेढ निर्माण होत असतानाच दुसरीकडे बंधुभावाचे आदर्शवत उदाहरण समोर आले आहे.

दोन्ही धार्मिक केंद्रांमधील सामाजिक आणि सांप्रदायिक एकोपा असा आहे. अजानच्यावेळी मंदिर आपले लाऊडस्पीकर (Loudspeaker) बंद करते, तर मशीद एकमेकांच्या आदराचे प्रतीक म्हणून मंदिराच्या भक्तांची तितकीच काळजी घेते. हे मंदिर पाटणा स्टेशनजवळील महावीर मंदिर आहे. आणि मंदिरापासून ५० मीटर अंतरावर न्यू मार्केटची पाटणा मशीद आहे.

hindus and muslims set the example of brotherhood in patna
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सभा; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

'मंदिर अजाना दरम्यान लाऊडस्पीकर (Loudspeaker) बंद करते. तर रामनवमीनिमित्त मंदिरात आलेल्या भाविकांना मशिदीने शरबतचे वाटप केल्याचे पाटणा मशिदीचे अध्यक्ष फैसल इमाम म्हणाले. मंदिरातील लाऊडस्पीकरवर (Loudspeaker) दिवसभर भजन-कीर्तन सुरु असते. पण अजानच्यावेळी ते बंद केले जातात. हीच तर एकतेची भावना आहे, असंही इमाम म्हणाले.

महावीर मंदिराचे अध्यक्ष किशोर कुणाल म्हणाले, आम्ही अनेकदा एकमेकांची मदत करतो, आणि बंधुभाव ठेवतो. "आम्हाला ना अजानमुळे काही अडचण होते. त्यांना मंदिराच्या भजन-कीर्तनाचीही काही अडचण होत नाही. आम्ही आमच्यात बंधुभाव ठेवतो. आणि अनेकदा एकमेकांना मदत करतो.

लाऊडस्पीकरच्या वादा दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका कायम ठेवली आहे. बिहार सरकार कधीही "अशा राजकारणात पडणार नाही" किंवा कोणत्याही धर्मात हस्तक्षेप करणार नाही, अस त्यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) विविध धार्मिक स्थळांवरून ५३,९४२ लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरच्या आवाजावर मर्यादा घालण्याच्या सूचना केल्या होत्या.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.