हिंदूत्व हे हिंसक हिंदू धर्म नव्हे- राहुल गांधींचे विधान

राहुल गांधी सध्या लंडनमध्ये आहेत. तेथून त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हिंदू धर्म आणि हिंदुत्व या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या आहेत, असाही दावा गांधी यांनी केला.
हिंदूत्व हे हिंसक हिंदू धर्म नव्हे-  राहुल गांधींचे विधान
हिंदूत्व हे हिंसक हिंदू धर्म नव्हे- राहुल गांधींचे विधानSaam Tv

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सर्वसमावेशक आणि राष्ट्रीयत्वाच्या तत्वज्ञानाला भाजपच्या द्वेषमूलक तत्वज्ञानाचे ग्रहण लागले आहे, असा दावा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेसच्या सोशल मिडिया विभागाच्या कार्यकर्त्यांशी 'जनजागरण अभियाना' अंतर्गत संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. मुस्लिम आणि शिखांचा द्वेष म्हणजे हिंदुत्व नव्हे असेही विधान त्यांनी केले.

राहुल गांधी सध्या लंडनमध्ये आहेत. तेथून त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हिंदू धर्म आणि हिंदुत्व या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या आहेत, असाही दावा गांधी यांनी केला. 'आपल्याला पटो अथवा न पटो परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या द्वेषमूलक तत्वज्ञानापुढे काँग्रेसच्या सर्वसमावेशक, स्नेहमय आणि राष्ट्रीयत्वाचे तत्त्व झाकोळले आहे. कॉंग्रेसचे तत्त्वज्ञान जिवंत आहे. पण त्यावर द्वेषाच्या तत्त्वज्ञानाचे सावट निर्माण झाले आहे. आपलं तत्त्वज्ञान आपण लोकांसमोर आक्रमकपणे मांडले नाही म्हणून याचा हा परिणाम असल्याचे, असेही राहुल गांधी यांनी यावेळी म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि आरएसएसवर त्यांच्या विचारधारेवरुन निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या सर्वसमावेशक आणि राष्ट्रीयत्वाच्या तत्वज्ञानाला भाजपच्या द्वेषमूलक तत्वज्ञानाचे ग्रहण लागले आहे, असा दावा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेसच्या सोशल मिडिया विभागाच्या कार्यकर्त्यांशी 'जनजागरण अभियाना' अंतर्गत संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. मुस्लिम आणि शिखांचा द्वेष म्हणजे हिंदुत्व नव्हे असेही विधान त्यांनी केले. हिंदू धर्म मुस्लिम आणि शिखांचा द्वेष करायला सांगत नाही. हिंदुत्व मात्र तसे सांगते, असेही विधान त्यांनी केले. हिंदू धर्म मुस्लिम आणि शिखांचा द्वेष करायला सांगत नाही. हिंदुत्व मात्र तसे सांगते, असेही विधान त्यांनी केले.

काँग्रेसच्या जन जागरण अभियानाला संबोधित करताना गांधींनी म्हटले की, 'काँग्रेसने आक्रमकपणे कधीच भाजपप्रमाणे आपल्या विचारसरणीचा प्रचार केला नाही.' गांधींनी लंडनला भेट देऊन काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.

हिंदू धर्म आणि हिंदुत्व या भिन्न गोष्टी आहेत. जर त्या एकच असतील तर मग त्यांची नावे एकच असायला हवीत. मुस्लिम आणि शिखांना मारा असे हिंदु धर्म सांगत नाही. हिंदुत्व मात्र तसे सांगते, असाही दावा यावेळी राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी : 'हिंदु धर्म आणि हिंदुत्व हे वेगळे'

हिंदुत्वावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, हिंदुत्व आणि हिंदू धर्म भिन्न आहेत. जर तुम्ही हिंदू असाल तर तुम्हाला हिंदुत्वाची काय गरज? भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, भाजप-आरएसएसने भारतात द्वेष पसरवला आहे, तर आमची विचारधारा ही प्रेम आणि बंधुभावाची आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, भारतात दोन विचारधारा आहेत, एक काँग्रेस पक्षाची आणि एक आरएसएसची विचारधारा. आजच्या भारतात भाजप-आरएसएसने द्वेष पसरवला आहे आणि एकता, बंधुता आणि प्रेमाची काँग्रेसची विचारधारा भाजपच्या द्वेषी विचारसरणीने झाकोळली आहे, हे मान्य करावेच लागेल. हटवले नाही काढले नाही पण त्यांचा प्रसार आमच्या प्रसारापेक्षा जास्त आहे. त्याच्या हातात लाऊडस्पीकर आहे. यंत्रसामग्री आहे.

हिंदू धर्म आणि हिंदुत्व यांच्यातील फरकावर मत व्यक्त करताना ते पुढे म्हणाले, "हिंदू धर्म आणि हिंदुत्वामध्ये काय फरक आहे, ते एकच असू शकतात का? जर ते एकच आहेत, तर त्यांचे नाव एकच का नाही? साहजिकच वेगळ्या गोष्टी आहेत. हिंदू धर्म शीख किंवा मुस्लिमांना मारहाण करणारा आहे का? हिंदुत्व नक्कीच आहे."

हिंदुत्वाची बरोबरी ISIS सोबत केल्याबद्दल भाजपचे राम कदम सलमान खुर्शीद यांच्याविरोधात तक्रार करणार आहेत.

हिंदूत्व हे हिंसक हिंदू धर्म नव्हे-  राहुल गांधींचे विधान
Mumbai: पत्नी बोलत नाही म्हणून, पतीने केली पत्नीची धारदार शस्त्राने हत्या!

खुर्शीद आणि अल्वी यांच्यात वाद;

काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांनी काल हिंदुत्व आणि ISIS ची तुलना केली होती. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य हे खुर्शिद यांचे समर्थन करणारे आहे, अशी भाजपत भावना आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. सलमान खुर्शिद आणि रशीद अल्वी यांनी हिंदुत्वाच्या व्याख्येचा अवमान केला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही हिंदुत्व ही जीवनशैली असल्याचे म्हटले आहे. तर राहुल गांधी हिंदुत्व हे हिंसक असल्याची टीका करत आहे. थोडक्यात ते खुर्शिद आणि अल्वी यांचेच समर्थन करत आहेत, असे मालवीय यांनी म्हटले आहे.

असे नाही की रशीद अल्वी यांचे असे वादग्रस्त विधान अलीकडच्या काळात समोर आले आहे, याआधी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हरामसारख्या कट्टरवादी संघटनांशी केली होती.

ज्येष्ठ काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचे नवीन पुस्तक 'सनराईज ओव्हर अयोध्या' वादात सापडले आहे कारण त्यांनी हिंदुत्वाची तुलना ISIS आणि बोको हरामसारख्या कट्टरपंथी गटांशी केली आहे. माजी केंद्रीय मंत्री खुर्शीद यांनी त्यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकातील ‘द केशर स्काय’ या अध्यायात ही कथित टिप्पणी केली आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे की, सध्याच्या युगातील हिंदुत्वाचे राजकीय स्वरूप संत-संतांच्या सनातन आणि प्राचीन हिंदू परंपरेला बाजूला सारत आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com