
Hingoli News: मनोरुग्ण व्यक्ती काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नसतो. मनावर आणि डोक्यावर ताबा नसल्याने या व्यक्ती कधीही स्वत:ला आणि दुसऱ्या व्यक्तीला हानी पोहचवू शकतात. त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहणे गरजे आहे. हिंगोलीत मनोरुग्णामुळे एक मुलगा थोडक्यात बचावला आहे. (Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या वसमत शहरात ही घटना घडली आहे. मनोरुग्णाने अल्पवयीन मुलाच्या डोक्यात दगड घालून त्यावर प्राणघातक हल्ला केलाय. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे. या घटनेत मुलगा थोडक्यात बचावला आहे.
वसमत पोलिसांनी हल्ला करणाऱ्या मनोरुग्णाला सत्यनारायण टॉकीज परिसरातून ताब्यात घेतले आहे. पंकज पार्डीकर असं या हल्ला करणाऱ्या मनोरुग्णाचं नाव आहे. दरम्यान, या घटनेत हल्ला झालेला अल्पवयीन मुलगा प्रणव मगर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यापूर्वी देखील या मनोरुग्णाने वसमत शहरात गाड्यांच्या काचांची तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकाराने वसमत शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून शहरात असलेल्या इतर मनोरुग्णांना देखील ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मनोरुग्णाने मुलावर हल्ला केलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये दिसत आहे साधरण दुपारच्या वेळी हा मुलगा रस्त्याने जात आहे. त्यावेळी तेथे जास्त वर्दळ नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे मनोरुग्ण थेट हातात एक दगड घेऊन धावत येतो आणि हा दगड त्या मुलाच्या डोक्यात जोरात मारतो. दगड लागताच शाळकरी मुलगा धाडकन खाली पडतो.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.