दहशतवाद्यांच्या रडारावर मुंबई; गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने मंगळवारी दहशतवादी हल्ल्यांचा कट उधळून लावण्यात आला
दहशतवाद्यांच्या रडारावर मुंबई; गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
दहशतवाद्यांच्या रडारावर मुंबई; गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठकSaam Tv

मुंबई : दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने मंगळवारी दहशतवादी हल्ल्यांचा terror attack कट उधळून लावण्यात आला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशातून ६ जणांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून अटक केलेला जान महंम्मद शेख उर्फ समीर कालिया हा सायंकाळपर्यंत मुंबईतच होता, अशी माहिती देखील समोर आली आहे. यामुळे मुंबईत परत दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती का? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

त्यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील home minister dilip walse patil यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे आणि संबंधितांना बैठकीत बोलावले आहे. त्यांच्याकडून माहिती घेण्यात येणार आहे. हे देशाच्या स्तरावर अंत्यत संवेदनशील आणि गंभीर प्रकरण जात आहे. बैठकीमधून सर्व माहिती घेऊन नेमके काय झाले आहे? हे सांगता येईल, असे पाटील म्हणाले आहेत.

हे देखील पहा-

पाकिस्तान मधील एका दहशतवादी मॉड्यूलचा दिल्ली पोलिसांनी भांडाफोड करण्यात आला होता. पाकिस्तान मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या २ दहशतवाद्यांबरोबरच एकूण ६ लोकांना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण देशामध्ये बॉम्बस्फोट घडवून मोठा संहार घडवून, आणण्याचा त्यांचा मोठा कट होता. यामधील सगळे आरोपी हे देशभरात मोठा हाहाकार माजविण्याच्या तयारीला लागले होते.

दहशतवाद्यांच्या रडारावर मुंबई; गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
Terrorist Attack : दिल्लीत 6 दहशतवाद्यांना अटक

दिल्ली पोलिसांनी जान महंमद शेख याला अटक करण्यात आली आहे. यानंतर मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र एटीएसने देखील जान शेख याच्या सायन या ठिकाणी असलेल्या घरी देखील धाड टाकली आहे. जान शेख याच्या घराची झडती घेण्यात आली आहे. त्यानंतर कुटुंबीयांना चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे. धारावी पोलिस स्टेशनमध्ये चौकशीकरिता नेण्यात आले होते.

मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावरचौकशीनंतर कुटुंबाला सोडण्यात आले आहे. काही प्रसारमाध्यमांनी सांगितलेल्या माहितीनुसार, जान शेख हा मुख्य सुत्रधार आहे. हाच जान शेख अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता. एवढेच नाहीतर जान शेख 2 पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. त्यांना देखील पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com