Horrible!  मृत आईला जिवंत भासवून मुलाने उकळले ४२ लाख रुपये
Horrible! मृत आईला जिवंत भासवून मुलाने उकळले ४२ लाख रुपये

Horrible! मृत आईला जिवंत भासवून मुलाने उकळले ४२ लाख रुपये

पैशाच्या लोभापायी एखादी व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकते, अशी अनेक उदाहरणे आपण दररोज पाहत असतो.

पैशाच्या (Money) लोभापायी एखादी व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकते, अशी अनेक उदाहरणे आपण दररोज पाहत असतो. मात्र पैशासाठी कोणी आपल्या मृत आईचाही वापर करु शकतो, ही कल्पनाच धक्कादायक वाटते. अशीच एक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या आईची पेन्शन मिळावी यासाठी चक्क त्याने आईचा मृतदेह अनेक महिने तळघरात लपवून ठेवला. ही घटना जेव्हा समोर आली तेव्हा पोलीसही प्रचंड हैराण झाले होते.

हे देखील पहा-

ऑस्ट्रियातून ही घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे जून २०२० मध्ये नैसर्गिक मृत्यू झाला. मात्र आईची पेन्शन मिळत रहावी यासाठी मुलाने घराच्या तळघरात आईचा मृतदेह लपवून ठेवला. मुलाने तिच्या शरीराचे ममीमध्ये रूपांतर केले आणि ते तळघरात वर्षाच्या सुमारे सव्वा वर्षांपर्यंत लपवून ठेवला. मृतदेहाला दुर्गंधी येऊ नये म्हणून त्याने बर्फ आणि विविध रासायनिक पट्ट्यांचा वापर केला. एका पोस्टमनच्या संशयावरून पोलिसांनी घरावर छापा टाकला असता सर्व प्रकार उघडकीस आला.

पोलीसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मेल ऑनलाईनच्या अहवालानुसार, आईची पेन्शन मिळत राहावी यासाठी आरोपीने आईचा मृतदेह एक वर्ष ममी बनवून घरात लपवून ठेवला होता.

Horrible!  मृत आईला जिवंत भासवून मुलाने उकळले ४२ लाख रुपये
साता-यात 'या' मार्गावर वन वे; पार्किंग व्यवस्थेतही बदल

मृत्यूनंतर आईची 42 लाख रुपयांची पेन्शन मिळवली.

मृत महिलेच्या 66 वर्षीय मुलाने गेल्या एका वर्षात त्याच्या आईच्या पेन्शन आणि सरकारी भत्त्याची सुमारे 42 लाख रुपयांहून अधिक रकमेची पेन्शन मिळवली. मात्र जेव्हा पोस्टमनने समाजकल्याण मेल वितरीत करण्यासाठी महिलेला भेटण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा मुलाने त्याला भेटण्यासाठी नकार दिला. यानंतर पोस्टमनला महिला बेपत्ता असल्याचा संशय आला. याची माहिती त्याने पोलीसांना दिली.

धक्कादायक म्हणजे मृत महिलेच्या ६६ वर्षीय मुलाने आपल्या भावापासूनही आईच्या मृत्यूची बाब लपवून ठेवली होती. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा फसवणूक युनिटचे प्रमुख हेल्मुट गॉफलर म्हणाले, "जर महिलेच्या मृत्यूची नोंद झाली असती तर तिला लगेच मिळणारे सर्व फायदे थांबले असते." त्या माणसाकडे उत्पन्नाचे इतर कोणतेही स्रोत नसल्याने त्याने आपल्या आईचा मृत्यू लपवण्याचा निर्णय घेतला. त्याने एक वर्ष आपल्या भावाला फसवले. आई आजारी आहे आणि तिला विशेष रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याची खोटी बाबही त्याने आपल्या भावाला सांगितली.

मात्र त्याने आपल्या आईची हत्या केली नाही आणि मृत्यू नैसर्गिक होता, हे तपासात समोर आले आहे. मात्र, आता त्याच्यावर आईचा मृतदेह लपवून ठेवणे आणि तिच्या नावावर पेन्शन आणि सरकारी फायदे घेतल्याचा गुन्हा दाखल होणार आहे.

Edited By- Anuradh

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com