Accident; कार आणि बसचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू
Accident; कार आणि बसचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यूSaam Tv

Accident; कार आणि बसचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

झारखंड मधील रामगढ जिल्ह्यातील राजराप्पा पोलीस स्टेशन परिसरामधील मुरबंदा लारीजवळ बस आणि कारची समोरा- समोर जोरात धडक झाली

रांची : झारखंड मधील रामगढ जिल्ह्यातील राजराप्पा पोलीस स्टेशन परिसरामधील मुरबंदा लारीजवळ बस आणि कारची समोरा- समोर जोरात धडक झाली आहे. बुधवारी झालेल्या या भीषण अपघातात भरधाव बसने कारला जोरदार धडक दिलेली आहे. या अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागली आहे.

हे देखील पहा-

यामध्ये कारमधील ५ जणांचा जळून मृत्यू झाला आहे. तर, बसमधील १२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. एका हिंदी वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार, महाराजा नावाची एक प्रवासी बस रामगडहून धनबादकडे जात होती. ही बस समोरुन येणाऱ्या वॅगनार कारला जोरात धडकली आहे. या अपघातात कार आणि बस या दोन्हीला आग लागली आहे. आग लागताच बस मधील प्रवासी बाहेर पडले, आणि त्यांनी आपला जीव वाचवला.

Accident; कार आणि बसचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू
दहशतवाद्यांच्या रडारावर मुंबई; गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

पण, कार मधील लोकांना बाहेर पडता आलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच राजरप्पा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक विपीन कुमार हे घटनास्थळी पोहोचले. बस आणि कार मधील आग आटोक्यात आणण्याकरिता अग्निशमन दलाला रामगढ हून पाचारण करण्यात आले आहे. अग्नीशमन दलाने कशीबशी आग विझविली आहे. पण तोपर्यंत उशीर झाला होता. या भीषण अपघातात कारमधील ५ जणांचा जळून मृत्यू झालेला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com