'SWIGGY डिलीव्हरी बॅाय'ने केला हॅाटेल मालकाचा खून

स्विगीच्या डिलिव्हरी बॉयने ग्रेटर नोएडामधील रेस्टॉरंट मालकाची गोळ्या झाडून हत्या केली आहे.
'SWIGGY डिलीव्हरी बॅाय'ने केला हॅाटेल मालकाचा खून
'SWIGGY डिलीव्हरी बॅाय'ने केला हॅाटेल मालकाचा खूनSaam Tv

नोएडा: स्विगीच्या डिलिव्हरी बॉयने ग्रेटर नोएडामधील रेस्टॉरंट मालकाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपी डिलीव्हरी बॉय फरार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार डिलिव्हरी बॉय रेस्टॉरंटच्या बाहेर ऑर्डरची वाट पाहत होता, पण जेव्हा ऑर्डरला उशीर झाला तेव्हा त्याने संतापून रेस्टॉरंट मालकाला गोळ्या घातल्या आहेत. ही घटना ग्रेटर नोएडाच्या बीटा -2 पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. जिथे 45 वर्षीय सुनील 'झमझम' नावाचे रेस्टॉरंट चालवत होता. हे रेस्टॉरंट ऑनलाईन फूड डिलीव्हरीसाठी काम करत असे. मंगळवारी रात्री 12:15 वाजता या रेस्टॉरंटमध्ये काम करणारा नारायण आणि स्विगीचा डिलीव्हरी बॉय यांच्यात वादावादी झाली.

'SWIGGY डिलीव्हरी बॅाय'ने केला हॅाटेल मालकाचा खून
चाकरमानी गणेशभक्तांना रायगडच्या पालकमंत्र्यांचे आवाहन!

घटनास्थळावरुण मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री स्विगीचा डिलीव्हरी बॉय चिकन बिर्याणी आणि पूरी भाजीचे आर्डर घेण्यासाठी आला होता. यामध्ये त्याला चिकन बिर्याणीची ऑर्डर देण्यात आली होती, तर पूरी भाजीच्या ऑर्डरला आणखी काही वेळ लागणार असे हॅाटेल मालकाने सांगितले होते. एका ऑर्डर द्यायला विलंब झाल्यामुळे एका मद्यधुंद डिलिव्हरी बॉयने नारायणला शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचा आरोप केला आहे. यावर हॅाटेल ऑपरेटर सुनील घटनास्थळी आला आणि वाद संपवण्याचा प्रयत्न सुरू केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुण त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने डिलिव्हरी बॉयने सुनीलच्या डोक्यात गोळी झाडली ज्यामुळे तो जागीच पडला. नारायणने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने सुनीलला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचबरोबर आरोपी डिलिव्हरी बॉय या घटनेनंतर घटनास्थळावरुण फरार झाला आहे. स्थानिक पोलिस जवळील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असा पोलिसांचा दावा केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com