Rajasthan High Court: व्यक्तिमत्व आणि शारीरिक रचनेनुसार प्रत्येकाला लिंग बदलण्याचा अधिकार; हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

व्यक्तिमत्व आणि शारीरिक रचनेनुसार लिंग बदल करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, अशी महत्वपूर्ण टिप्पणी राजस्थान उच्च न्यायालयानने केली आहे.
Rajasthan High Court
Rajasthan High CourtSaam TV

Rajasthan High Court: पुरुष असो वा स्त्री कोणत्याही व्यक्तीला आपले लिंग बदलण्याचा अधिकार आहे. व्यक्तिमत्व आणि शारीरिक रचनेनुसार लिंग बदल करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, अशी महत्वपूर्ण टिप्पणी राजस्थान उच्च न्यायालयानने केली आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. (Latest Marathi News)

या प्रकरणातील ३२ वर्षीय याचिकाकर्त्याचा जन्म एक महिला म्हणून झाला होता. ही महिला एका शाळेत शारीरिक शिक्षण विषय शिकवत होती. काही दिवसानंतर या महिलेला आपण पुरूष असल्याचं जाणवू लागलं. त्यानंतर तिने डॉक्टरांच्या सल्ल्याने लिंग बदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

Rajasthan High Court
Pimpri Chinchwad Crime: जिथे घातली दहशत तिथेच उतरवला माज; तळेगावात पोलिसांनी काढली किटक टोळीची धिंड

डॉक्टरांनी या महिलेवर शस्त्रक्रिया करत तिचे लिंग बदल केले. यानंतर ही महिला पुरुष बनली. शस्त्रक्रियेनंतर युरोलॉजिस्ट डॉक्टरांनी तिला यासंदर्भातील प्रमाणपत्रही दिले. यानंतर तिने याच प्रमाणपत्राच्या आधारावर आपले नाव बदलले.

मात्र, व्यावसायिक जीवनात हा बदल करण्यासाठी तिला अनेक अडचणी येऊ लागल्या. अनेक अर्ज सादर करूनही तिचे नाव सर्व्हिस रेकॉर्डमध्ये बदलण्यात आले नाही. अखेर वैतागून तिने न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान, यावर राजस्थान उच्च न्यायालयाने सुनावणी घेतली.

कोणत्याही मानवाला त्याचे लिंग आणि ओळख निवडण्याचा अधिकार आहे, तो त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. शिक्षिकेच्या परिस्थितीची दखल घेत न्यायालयाने डीएमला दोन महिन्यांत तिला प्रमाणपत्र देण्यास सांगितले. आणि सेवा रेकॉर्डमध्ये तिचे नाव आणि लिंग बदलण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

न्यायमूर्ती अनूप कुमार धांड यांनी आपला निकाल देताना सांगितले की, प्रत्येकाला लिंग ओळखीच्या आधारावर भेदभाव न करता सर्व मानवी हक्कांचा उपभोग घेण्याचा अधिकार आहे. न्यायालयाने निरीक्षण केले की, या ग्रहावरील प्रत्येकाला आदर आणि सन्मानाने वागण्याचा अधिकार आहे, मग तो पुरुष असो वा स्त्री किंवा इतर कोणतेही लिंग.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com