
Husband and Wife Romance Video : सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जात. सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. सोशल मीडियावर रील बनवून फेमस होण्याच्या नादात काहीजण आपला आणि समोरच्या व्यक्तीचा जीव देखील धोक्यात टाकतात. असाच काहीसा एक व्हिडीओ समोर आला आहे. (Latest Marathi News)
सोशल मीडिया (Social Media) हा आजकाल प्रसिद्ध होण्याचा सर्वात सोपा मार्ग बनला आहे. कधी कधी काहीतरी विचित्र करून लोक प्रसिद्ध होतात. कुणी रील बनवण्यासाठी उंचावरून उडी मारताना दिसतो, तर कुणी रेल्वे ट्रॅकवर फोटोग्राफी करताना दिसतो. अलीकडे अशीच एक व्यक्ती स्टेरिंग सोडून कार चालवताना दिसत आहे.
विशेष बाब म्हणजे हा धोकादायक स्टंट करताना तो कारमध्ये एकटा नसून त्याच्यासोबत एक महिलाही दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, लोक याला अत्यंत बेजबाबदार म्हणत आहेत. अनेकांनी या व्यक्तीचा समाचार देखील घेतला असून पोलिसांनी (Police) तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
धावत्या कारमध्ये जोडप्याचा रोमान्स
व्हायरल (Viral Video) झालेला व्हिडिओ ट्विटरवर Xroaders नावाच्या अकाऊंटने शेअर केलेला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती कारचे हँडल न पकडता गाडी चालवताना दिसत आहे. या व्यक्तीच्या शेजारी एक महिला देखील त्याच्यासोबत बसलेली दिसत आहे, जी कदाचित त्याची पत्नी असू शकते. कधी कारमध्ये बसलेले हे जोडपे मस्ती करताना तर कधी फोटो काढत रोमान्स करताना दिसून येत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे जोडप्याने धावत्या कारचे स्टेरिंग सोडून हे कृत्य केलं आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ ट्विटरवर 1 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने लिहिले की, 'अशी रील करण्याच्या नादात कुणाचा जीव जाऊ शकतो'. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, 'अशा बेफिकीर आणि बेजबाबदार लोकांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे. आरटीओ कृपया दखल घ्या.'
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.