Crime News : पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं; पतीचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

Uttar Pradesh Crime News : एका विवाहित महिलाला भेटायला तिचा प्रियकर घरी आला. नवरा घरात नाही पाहून त्या दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण, याची कुणकुण पतीला लागली.
Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime News Saam TV

Uttar Pradesh Crime : मागील काही दिवसांपासून देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातील बरेच गुन्हे विवाह्यबाह्य संबंधातून घडत आहे. पत्नी असो पती दोघांपैकी कोणाचंही घराबाहेर अफेयर सुरु झालं की अशा अनेक घटनांचा शेवट आहे गुन्हेगारीकडे जातो. अशीच एक धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातून समोर आली आहे. (Latest Marathi News)

Uttar Pradesh Crime News
Crime News : महिलांनी पाजली दारू, नराधमांनी केला सामूहिक अत्याचार; १७ वर्षीय मुलीसोबत घडला भयावह प्रकार

एका विवाहित महिलाला भेटायला तिचा प्रियकर घरी आला. नवरा घरात नाही पाहून त्या दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण, याची कुणकुण पतीला लागली. पतीने दोघांना नको त्या अवस्थेत बघितलं आणि त्याचा पायाखालची जमीनच सरकली.

पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत बघून पतीचा पारा चढला. त्याने प्रियकराला मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद इतका विकोपाला गेला की, मारहाणात पत्नीच्या प्रियकराचा जागीच मृत्यू झाला. आपल्या हातून खून (Crime News)  झाल्याचं पाहून पती घाबरला आहे. त्याने गावाबाहेर त्याचा मृतदेह फेकून दिला.

याप्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्तीची पत्नी हिमाचल प्रदेशातील एका खाजगी कंपनीवर काम करत असताना तिची तिथल्या एका पुरूषाची जवळीक वाढली.

Uttar Pradesh Crime News
Pune Accident: पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात! १५ फूटांवरून कोसळली प्रवाशांनी भरलेली बस

कालांतराने दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांचाही प्रेमात इतका आकंठ बुडाला की, त्या दोघांनी एकत्र जगण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना माहिती होतं की आपल्या प्रेमाचा शेवट हा वाईट होऊ शकतो. म्हणून त्यांनी एकत्र मरण्याची शपथही घेतली होती.

काही दिवसांनी त्या महिलेच्या नवऱ्याला या अफेरयची भनक लागली. त्याने तातडीने बायकोला घेऊन हिमाचल प्रदेश सोडून गाव आदमपूर गाठलं आणि पत्नीच्या प्रियकराला समज दिली. तरी सुद्धा दोघांनी काही त्याचं ऐकलं नाही. दिवसेंदिवस त्यांचं प्रेम वाढत होतं.

शेवटी तिने नवरा घरी नाही हे पाहून प्रियकराला गुरुवारी रात्री घरी बोलवलं. अनेक दिवसांनी दोघे भेटल्यामुळे त्यांचा आनंदाला थारा नव्हता. दोघेही आनंदात असताना एकमेकांच्या मिठीत असताना अचानक नवरा तिथे आला आणि त्याने पत्नीला त्या पुरुषासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं. त्यातून त्याने पत्नीच्या प्रियकराची हत्या केली.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com