
Husband Cheating Wife Case : एखाद्या महिलेने कधी स्वप्नातही विचार केला नसेल, असा प्रकार गुजरातमधील वडोदा शहरातून समोर आला आहे. लग्नाच्या तब्बल ८ वर्षानंतर एका महिलेला (Women) आपल्या पतीचं असं काही गुपीत कळलं की तिच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्न होऊन ८ वर्ष उलटल्यानंतर या महिलेला कळालं की आपला पती (Husband) लग्नाआधी बाई होता. आपली फसवणूक (Cheating) झाल्याचं लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेतली. (Husband Wife Real Relationship)
काय आहे प्रकरण?
२०१४ साली विराज नामक डॉक्टर तरुणाचं कोमल नामक (दोघांचेही नाव बदलले आहेत) तरुणीसोबत (Wife) लग्न झालं. लग्नानंतर ते हनीमूनसाठी जम्मू-काश्मीरला सुद्धा गेले. तक्रारदार कोमलने आरोप केला आहे की विराज तिच्यासोबत कधीही शारिरीक संबंध ठेवण्यास उत्सुक नसायचा. फारच मनधरणी केल्यानंतर एका अपघातामुळे मी संबंध ठेऊ शकत नाही, शस्त्रक्रिया झाल्यानंतर लवकरच सर्व काही ठिक होईल, असा दिलासा विराज कोमलला देत असायचा.
कोमलने आरोप केलाय की जानेवारी २०२० मध्ये लठ्ठपणा कमी करण्याचं कारण सांगत विराज कोलकाता येथे बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेसाठी गेला. मात्र, प्रत्यक्षात त्याने तिथे लठ्ठपणा कमी करण्याची शस्त्रक्रिया नाही तर, लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया केली. विराजने आपल्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध देखील ठेवल्याचा आरोप कोमलने केला आहे. (Fraud Between Husband And Wife)
याबाबत विराजला जाब विचारला असता, कोणालाही काही सांगितल्यास त्याचे परिणाम खूप वाईट होतील, अशी धमकी सुद्धा दिल्याचा आरोप कोमलने केला आहे. विराजचे स्त्री असतानाचे नाव विजया होते असं देखील कोमलने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. कोमल आणि डॉ. विराज यांची ओळख एका विवाहसूचक वेबसाईटवरून दिल्लीत झाली होती.
विराजसोबत कोमलचं दुसरं लग्न झालेलं आहे. २०११ साली कोमलच्या पहिल्या पतीचं निधन झालं होतं. त्यानंतर तिने विराजसोबत संसार थाटला. पहिल्या पतीपासून कोमलला १४ वर्षांची मुलगी देखील आहे. दरम्यान, विराजचं गुपीत उघड होताच, कोमलने पोलिसांत तक्रार दाखल केली. कोमलच्या तक्रारीवरून विराजवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच पोलिसांनी त्याला अटकही केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.