UP Crime News: लग्नाच्या 3 महिन्यानंतरही पतीचा हनिमूनला नकार, सासूने जाब विचारताच जावयाने दिलं हादरवणारं उत्तर

Husband Demands Dowry for Honeymoon In UP: उत्तर प्रदेशातील पिलीभीतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Marriage
MarriageSaam TV

UP News: उत्तर प्रदेशातील पिलीभीतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंडा म्हणून 10 लाख रुपये न मिळाल्याने लग्नाला तीन महिने उलटूनही पतीने अजून स्पर्श केला नसल्याचं या महिलेने सांगितलं आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये 5 लाख रुपयांचा करार झाला होता त्यानंतर वधू-वर हनिमूनसाठी नैनितालला गेले. नैनितालमध्येही पती हा आपल्या नववधूपासून लांब राहिल्याचा आरोप आहे. (Latest Marathi News)

Marriage
Gujarat Crime News: क्रूरतेचा कळस! आधी बलात्कार मग करून प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पूड

अश्लील फोटो काढल्याचा आरोप

इतकंच नाही तर नैनितालमध्ये असताना पतीने आपले अश्लील फोटो काढल्याचा आरोप देखील पत्नीने केला आहे. एवढ्यावरच न थांबता पतीने त्याने ब्लॅकमेल करत हुंड्याची (Dowery) मागणी सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पत्नीने पिलीभीत कोतवाली पोलीस (Police) ठाण्यात सासू आणि पतीविरुद्ध तक्रार  दाखल केली.

पीडितेचे म्हणणे आहे की, तिचा विवाह 6 फेब्रुवारी 2023 रोजी बदाऊन पोलीस स्टेशनच्या बिसौली भागातील एका तरुणाशी झाला होता. त्याच्या नातेवाईकांनी क्षमतेनुसार 20 लाख रुपये खर्च केले होते. (UP News)

यामध्ये 15 लाखांचे दागिनेही हुंडा म्हणून देण्यात आले होते. पण, पतीने लग्नानंतर नववधूला स्पर्शही केला नाही. तसेच, लग्नाच्या ३ महिन्यांनंतरही पतीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत. 29 मार्च रोजी तिने सासूला या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. मात्र सासूने देखील याकडे लक्ष दिले नाही.

संपूर्ण प्रकार आईला सांगितला

काही दिवसांनी पीडित मुलगी पिलीभीत येथील तिच्या घरी आली असता तिने हा संपूर्ण प्रकार आईला सांगितला. यानंतर 22 एप्रिल रोजी पीडितेचा पती तिला घेण्यासाठी पिलीभीत येथे आला असता, तिच्या आईने जावयाला याबाबत जाब विचारला तसेच काही आजार असेल तर सांगा, आपण उपचार करु असे म्हणाल्या. यावर नवरा म्हणाला, १० लाख रुपये द्या मग आम्ही हनिमूनला जाऊ.

Marriage
Trimbakeshwar Temple News: त्र्यंबकेश्वरच्या वादात आता आखाड्याची उडी, सत्य शोधण्यासाठी समितीची स्थापना

कुटुंबीयांनी दिले ५ लाख रुपये

यावर कुटुंबीयांनी ५ लाख रुपये दिले आणि दोघेही हनिमूनला नैनितालला गेले. वधूने सांगितले की ती तिच्या पतीसोबत एकाच खोलीत राहिली. मात्र, पतीने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. उरलेले ५ लाख रुपये घेऊन ये आणि पैसे न दिल्यास हा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. (Crime News)

13 मे रोजी पीडित महिला पतीच्या घरातून माहेरी आली आणि तिने सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर पीडितेने पिलीभीत पोलीस ठाण्यात सासू आणि पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com