Women Fight : दोन बायका फजिती ऐका! दोघींनीही नवऱ्याला धू धू धुतलं, VIDEO व्हायरल

दोन्ही महिलांनी मारहाण करताना आपल्या नवऱ्याचे कपडे देखील फाडले आहेत.
Husbend Wife Fighting Video
Husbend Wife Fighting Video Saam TV

Husband Wife Fighting Video : दोन बायका आणि फजिती ऐका अशी मराठीत म्हण आहे. याचाच प्रत्यय उत्तरप्रदेशातील एका प्रकरणातून आलाय. उत्तरप्रदेशात दोन बायकांनी मिळून आपल्याच पतीला (Husband) बेदम मारहाण केली आहे. पतीला मारहाण करताना दोन्ही बायका इतक्या बेभान झाल्या होत्या की त्यांनी भररस्त्यात आपल्या नवऱ्याचे कपडे देखील फाडले. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. (Angry Wife Fighting With Husband)

Husbend Wife Fighting Video
Bull vs Bull Fights : दोन बैलांमध्ये जबरदस्त फाईट, वातावरण टाईट; पाहा VIDEO

नेमकं काय घडलं?

दोन बायकांनी (Wife) मिळून नवऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) फर्रुखाबाद जिल्हा सत्र न्यायालय परिसरात घडलाय. या दोन्ही महिलांनी मारहाण करताना आपल्या नवऱ्याचे कपडे देखील फाडले आहेत. दोन्ही महिलांनी नवऱ्याला मारहाण सुरू करताच परिसरात मोठी गर्दी जमली होती. परिसरातील नागरिकांनी कशीबशी दोन्ही महिलांचा तावडीतून या व्यक्तीची सुटका केली.

काय आहे प्रकरण?

प्राप्त माहितीनुसार, मारहाण झालेल्या व्यक्ती हा एका सरकारी शाळेत शिक्षक असून या व्यक्तीने दोन लग्न केले आहे. पहिल्या पत्नीपासून या व्यक्तीला दोन अपत्ये आहे. तर दुसऱ्या पत्नीपासून त्याला नुकतंच एक अपत्य झालंय. पहिल्या पत्नीसोबत वाद होत असल्याच्या कारणाने या व्यक्तीने तिला न सांगता दुसरे लग्न केले. काही दिवसानंतर आपल्या पतीने दुसरे लग्न केल्याची माहिती तिला मिळाली. (Wife Fight with Another Lady for her Husband)

नवऱ्याने आपली फसवणूक केली असल्याचं लक्षात येताच, पहिल्या पत्नीसह दुसऱ्या पत्नीने देखील त्याच्यावर खटला दाखल केला. गुरूवारी दुपारच्या तिघांनाही वकिलांनी फर्रुखाबाद न्यायालय परिसरात बोलावले होते. दरम्यान, तिथे काही कारणावरून तिघांमध्येही वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही महिलांनी आपल्या पतीची चांगलीच धुलाई केली.

मध्यस्थी करणारा वकिलही चोपला

दरम्यान, दोन्ही महिलांनी भर रस्त्यावरच आपल्या पतीला मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत त्यांनी आपल्या पतीचे कपडे देखील फाडले. या महिलांना इतका राग अनावर झाला होता की मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या वकिलांना सुद्धा त्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com