Hyderabad Crime News: निकालानंतर ६ विद्यार्थ्यांची आत्महत्या; हृदयद्रावक घटनेनं हैदराबाद हादरलं

6 Students Ended Life: अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत अपयश येते. समाजाच्या भीतीपोटी काही मुलं टोकाचं पाऊल उचलतात.
6 Students Ended Life
6 Students Ended LifeSaam tv

Crime News: विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाचे मुल्यांकन त्याच्या एक परिक्षेवर केले जाते. या परिक्षेत त्यांना किती गुण मिळालेत यावर ते किती हुशार आणि किती ढ असं ठरवलं जातं. अशात अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत अपयश येते. समाजाच्या भीतीपोटी काही मुलं टोकाचं पाऊल उचलतात. (TSBIE Students)

तेलंगणा येथून अशीच एक मोठी दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथे स्टेट बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एज्युकेशन (TSBIE)ने मंगळवारी आपला निकाल जाहीर केला. या परीक्षेत काही विद्यार्थी नापास झाले आहेत. निकाल हाती येताच काही विद्यार्थ्यांनी थेट आत्महत्या केली आहे. तेलंगणामधील ५ आणि निजामाबादमधील १ अशा एकून ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

6 Students Ended Life
Crime News: दोन बहिणी एक वर्ष घरात कोंडून राहिल्या; दरवाजा उघडताच पोलिसांनाही बसला धक्का

यामध्ये तीन मुली आणि तीन मुलांचा समावेश आहे. ९ मे रोजी या मुलांच्या परीक्षेचा निकाल लागला होता. त्यानंतर २ दिवसांत ६ मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वनस्थलीपुरम येथील एका १७ वर्षीय विद्यार्थ्यीनीनेही आत्महत्या केलीये.

रायदुर्गमधील १६ वर्षीय विद्यार्थीनी आणि पंजागुट्टा या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थीनींनी आपलं जीवन संपवल आहे. या तिघीही जी इंटरमिजिएटच्या शेवटच्या वर्षात शिकत होत्या.

6 Students Ended Life
Goa Crime News: पती नव्हे हैवान! मित्राला घरी बोलावून पत्नीसोबत केलं भयानक कृत्य

तसेच नेरेडमेट आणि सैफाबाद येथे राहणाऱ्या दोन विद्यार्थांनी (Students) आपलं जीवन संपवलं आहे. हे दोघेही द्वितीय वर्षात शिकत होते. या आधी देखील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. महबूबाबाद या जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याला एमबीएसाठी अॅडमीशन न मिळाल्याने त्यानेही राहत्या घरी आत्महत्या केली. अशात आता एकाच वेळी ६ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com