आईसस्क्रीम खूप खाल्ली असेल, पण कधी '24 कॅरेट' सोन्याची आईसस्क्रीम खाल्लीये का?

या आईसस्क्रीमची किंमत 500 रुपये असून त्यावर अतिरिक्त कर आकारला जातो.
Gold Ice Cream
Gold Ice CreamInstagram

हैद्राबाद - इंटरनेटवर बहुतेक लोकांना अन्नाशी संबंधित गोष्टी पाहणे आवडते. गोड पदार्थ असो किंवा चटपटी पाणी पुरी आपली नजर नेहमीच त्यावर असते. आपल्याला सोशल मीडियावर नवनवीन खाद्यपदार्थ अनेकदा पाहायला मिळतात. आतापर्यंत तुम्ही सोन्याच्या मिठाईबद्दल ऐकले असेलच, पण आता बाजारात गोल्ड प्लेटेड आईसस्क्रीम (Ice Cream) देखील आली आहे. अनेकदा सोन्याचं नाव ऐकलं की आपल्या मनात सोनायचे दागिने येतात. पण तुम्हाला 24 कॅरेट सोन्यापासून (Gold) बनवलेल्या आईसस्क्रीमबद्दल सांगितलं तर तुम्ही नक्कीच गोंधळून जाल. (Hyderabad ice cream store serves 24 carat gold ice cream)

हिवाळ्यात आईसस्क्रीमप्रेमींना २४ कॅरेट सोन्याचे आईसस्क्रीम खाण्याची संधी मिळत आहे. फूड ब्लॉगर अभिनव जेसवानी यांनी या आइस्क्रीमचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यानंतर सोनायच्या आईसस्क्रीमचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हे गोल्ड प्लेटेड आईसस्क्रीम बनवताना दिसत आहे. व्हिडिओची सुरुवात चॉकलेट कोनमध्ये आईस्क्रीम टाकण्यापासून होते. मग त्यानंतर हा माणूस त्यावर सोन्याचा वर्ख ठेवतो आणि त्यावर चेरी टाकतो.

अभिनव जेसवानीनं जस्ट नागपूर थिंग्स नावाच्या त्याच्या इंगटग्राम हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हे 24K गोल्ड आईसस्क्रीम हैदराबादमधल्या Huber & Holly नावाच्या कॅफेतलं आहे. आजपर्यंत मी असं आईस्क्रीम कुठंही खाल्लेलं नाही. तुम्ही पण एकदा नक्की खाऊन बघा. या आईसस्क्रीमची किंमत 500 रुपये असून त्यावर अतिरिक्त कर आकारला जातो. असे कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com