हैदराबादमध्ये अमित शहांच्या सुरक्षेत मोठी चूक! टीआरएस नेत्याचा ताफा रोखण्याचा प्रयत्न

केंद्र सरकारने आज 'हैदराबाद मुक्ती दिना'निमित्त सिकंदराबादमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
Amit Shaha
Amit ShahaSaam Tv

हैदराबाद: हैदराबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. तेलंगणा राष्ट्र समितीच्या एका कार्यकर्त्याने अमित शाह यांच्या ताफ्यासमोर कार उभी केली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांनी टीआरएस कार्यकर्त्याला बाजूला केले. जी श्रीनिवास अस या नेत्याचे नाव आहे. या नेत्याने गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्या ताफ्यासमोर कार उभी केली होती.

"माझी गाडी आपोआप थांबली. मी खूप टेन्शन मध्ये होतो. मी पोलिस अधिकाऱ्यांशी बोलेन.", अस नेते श्रीनिवास म्हणाले. पोलिसांनी माझ्या गाडीची तोडफोड केल्याचा आरोप टीआरएस नेत्याने केला. 'मी निघून जाईन, हे प्रकरण अर्थ नसताना वाढवले ​​जात आहे.' असंही श्रीनिवास म्हणाले.

Amit Shaha
Ahmadnagar News : आईनेच पोटच्या मुलीला परपुरूषाशी संबंध ठेवण्यास भाग पाडलं; काळिमा फासणारी घटना

केंद्र सरकारने आज 'हैदराबाद मुक्ती दिना'निमित्त सिकंदराबादमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा हे प्रमुख पाहुणे असून या कार्यक्रमानिमित्त ते हैदराबादला गेले आहेत. तत्पूर्वी, गृहमंत्री अमित शहा यांनी आज हैदराबाद मुक्तीचे श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांना दिले आहे.

हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमात शाह म्हणाले की, जर सरदार पटेल नसते तर हैदराबाद मुक्त व्हायला अजून बरीच वर्षे लागली असती. निजामाच्या रझाकारांचा पराभव झाल्याशिवाय अखंड भारताचे स्वप्न साकार होणार नाही हे पटेलांना माहीत होते, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Amit Shaha
दोघे खंबीर होते, मग काय झालं ? वेदांता प्रकल्पावरुन अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

'इतक्या वर्षांनंतर सरकारच्या सहभागाने ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ साजरा व्हावा, ही या भूमीतील जनतेची इच्छा होती, मात्र ७५ वर्षांनंतरही राजकारण सुरू आहे, हे दुर्दैव आहे. इथे "हैदराबाद मुक्ती दिन" साजरा करण्याचे धाडस करू शकले नाहीत, अमित शहा (Amit Shaha) म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com