Hyderabad: कारमधील गँगरेप प्रकरणात दुसरी अटक; प्रमुख व्यक्तीच्या मुलाचा सहभाग

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये धक्कादायक घटना काल उघडकीस आली होती. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती.
Arrest
ArrestSaam Tv

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये धक्कादायक घटना काल उघडकीस आली होती. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. पीडित मुलगी पबमध्ये पार्टी करून घरी परतत असताना ही घटना घडल्याचे सांगितले जात होते. अलिशान कारमध्ये पीडितेवर अत्याचार करण्यात आले. तर, संशयित आरोपींमध्ये हायप्रोफाइल नावे असल्याचे सांगण्यात येत होते. या सामूहिक बलात्कार प्रकरणात आता पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर पहिला आरोपी सिदुद्दीन मलिकला एक दिवस आधी अटक करण्यात आली होती.

हैदराबादमधील एका पबमध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलीवर काही अल्पवयीन मुलांनी कथित प्रकारे गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली आहे. पोलिसांनी याबाबद्दल सांगितले की, पीडित तरुणी एका मैत्रिणीसोबत एका पॉश भागात असणाऱ्या एका पबमध्ये (Pub) गेली होती, तेव्हा तिला तिथे अल्पवयीन मुलांचा एक ग्रुप भेटला. ते म्हणाले की, मुलीचा मित्र यावेळी पबमध्येच थांबला आणि ती दुसऱ्या मुलांसोबत कारमध्ये बसून निघून गेली.

हैदराबाद पोलिसांनी माहिती दिली की, जुबली हिल्स परिसरात सामूहिक बलात्कार झाला आहे. 3 अल्पवयीन मुलांसह पाच मुलांवर बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे. हैदराबादच्या पश्चिम विभागाचे डीसीपी जोएल डेव्हिड यांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांनी 31 मे रोजी जुबली हिल्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात त्यांनी म्हंटल होत, त्यांची मुलगी 28 मे रोजी पार्टीसाठी तिच्या मित्रांसोबत एका पबमध्ये गेली होती. पण जेव्हा ती परत आली तेव्हा त्याना धक्काच बसला. तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या, कपडे फाटलेले होते. त्यांनतर त्यांनी काही मुलांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. मात्र, या प्रकरणात बलात्काराची शक्यता असल्याने काही कलमे बदलण्याची शक्यता आहे. तर, आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Arrest
जखमी शाहरुख, चेहऱ्यावर बँडेज; 'जवान'चा टीझर प्रदर्शित

पीडितेने सांगितले एका मुलाचे नाव;

पोलिसांनी पीडितेची कसून चौकशी केली असता, तिने सांगितले की, तिच्यावर 5 मुलांनी सामूहिक बलात्कार केला. चौकशीदरम्यान ती फक्त एका मुलाचे नाव सांगू शकली. प्रकरणातील पाच आरोपींची ओळख पटली आहे. डीसीपी म्हणाले की, पीडितेच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी तपास सुरू केला, चौकशी, सीसीटीव्ही फुटेज आणि विविध गोष्टींच्या तपासणीनंतर असे आढळून आले की आरोपींपैकी 2 मोठे आहेत आहेत आणि 3 जण अल्पवयीन आहेत. मुख्य आरोपी, शाहदुद्दीन मल्लिक (18), हा अल्पवयीन आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अल्पवयीन आरोपींची नावे किंवा त्यांच्या कुटुंबाची नावे करण्यात आलेली नाहीत.

हे देखील पाहा-

आमदाराच्या मुलाचा सहभाग नाही;

डीसीपी म्हणाले की, आरोपींमध्ये एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या मुलाचा समावेश आहे. वृत्तानुसार, एका आमदाराच्या मुलाचा समावेश असल्याचे बोलले जात आहे, परंतु आतापर्यंत झालेल्या तपासानुसार किंवा पीडितेच्या वक्तव्यानुसार मुलगा कोणत्याही आमदाराच्या किंवा त्याच्या नावाचा समावेश नाही, पुढील तपासात आणखी कोणाचा सहभाग असेल तर त्याला सोडले जाणार नाही, जरी तो आमदाराला मुलगा असला तरी, असे ते म्हणाले म्हणाले. त्यांनी सांगितलं की, आज सकाळपासून काही माध्यमांतून या सामूहिक बलात्कारात गृहराज्यमंत्र्यांचा नातू सामील असल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे, एखाद्या निरपराध व्यक्तीची दिशाभूल करून त्याची बदनामी करणे अत्यंत चुकीचे आहे. ज्याने खोट्या बातम्या पसरवल्या किंवा मिडीयावर अल्पवयीन किंवा निष्पापाचे दृश्य दाखवले किंवा सोशल मीडियावर व्हायरल केले, त्याच्यावर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com