Shailbala Martin News: मणिपूरमधील महिलांना काय वाटलं असेल? 'फ्लाइंग किस'च्या मुद्द्यावर IAS अधिकाऱ्यांचा महिला खासदारांना सवाल

Shailbala Martin On BJP Female MPs: यावरुन भाजपच्या महिला खासदारांना आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन यांनी मणिपूरमधील महिलांची आठवण करुन दिली आहे.
Shailbala Martin News
Shailbala Martin NewsSaam TV

Manipur Clashes:

काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या फ्लाईंग किसचा मुद्दा चांगलाच गाजलाय. भाजपच्या महिला खासदारांनी काल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे याबाबत कारवाई करण्याची मागणी केली. यावरुन भाजपच्या महिला खासदारांना आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन यांनी मणिपूरमधील महिलांची आठवण करुन दिली आहे. (Latest Marathi News)

राहुल गांधींवर टीकास्त्र डागत काल २२ महिला खासदारांनी ओम बिर्ला यांना एक पत्र लिहिलं. त्यावर या २२ महिला खासदारांच्या सह्या होत्या. आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन यांनी या पत्राचा फोटो आपल्या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. तसेच यात कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "जरा विचार करा मणिपूरमधील महिलांना कसे वाटले असेल?"

Shailbala Martin News
Amit Shah on Manipur: संसदेतील आक्रमक भाषणानंतर अमित शहा अ‍ॅक्शन मोडमध्ये; मणिपूरबाबत घेतला मोठा निर्णय

आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन यांनी केलेल्या ट्वीटची सध्या मोठी चर्चा होत आहे. बुधवारी राहुल गांधींनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. त्यानंतर सभागृहाबाहेर पडत असताना त्यांच्या हातातील कागद खाली पडले. यावर सत्ताधारी पक्षातील काही नेते त्यांच्यावर हसू लागले. त्यामुळे राहुल गांधींनी त्यांना फ्लाईंग किस केलं.

राहुल गांधींनी दिलेल्या प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली. मात्र हसत असलेल्या सत्ताधाऱ्यांचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला नाही. अशात काल झालेल्या राहुल गांधींच्या भाषणानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत बोलणार आहेत. केंद्र सरकावरील अविश्वास ठरावाच्या चर्चेवरील आज शेवटचा दिवस असून या ठरावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत भाषण करणार आहेत. मणिपूर हिंसाचारावरून मोदी काही बोलणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Shailbala Martin News
Manipur Clashes Update: मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना! पोलिसाची निर्घृण हत्या, जमावाने पोलीस चौकीवर हल्ला करत शस्त्रे पळवली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com