IAS Tina Dabi: पाकिस्तानी हिंदूंच्या मदतीला धावल्या IAS टीना दाबी! बेघरांसाठी आखली खास योजना; सोशल मीडियावर होतेयं चर्चा

IAS Tina Dabi Latest News: भारतातील चर्चित प्रशासकीय अधिकाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे आयएएस ऑफिसर टीना डाबी होय. सध्या त्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे...
IAS Tina Dabi News
IAS Tina Dabi NewsSaamtv

Rajsthan News: भारतातील काही बहुचर्चित प्रशासकीय अधिकाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे आयएएस ऑफिसर टीना डाबी होय. टीना दाबी या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्या राजस्थानमधील त्यांच्या बोलडोझर कारवाईवरुन चर्चेत आल्या आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू...

IAS Tina Dabi News
Tulja Bhavani Mandir : भाविकांनाे! या कपड्यांवर तुळजाभवानी मंदिर परिसरात बंदी; काय आहे कारण... (पाहा व्हिडिओ)

घरांवर केली होती कारवाई...

राजस्थानच्या (Rajasthan) जैसलमेर जिल्ह्यात डीएम पदावर तैनात असलेल्या टीना डाबी यांच्यावर त्यांच्या आदेशानंतर जिल्ह्यात राहणाऱ्या काही विस्थापित हिंदू कुटुंबांच्या घरांवर बुलडोझर चालवल्याचा आरोप आहे. ही हिंदू कुटुंबे पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झाली आणि बराच काळ या भागात राहत होती. या कारवाईनंतर त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे.

मदतीचा हात....

मात्र या कारवाईनंतर त्यांनी केलेल्या एका कृतीने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बेकायदेशीर घरे पाडून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या जैसलमेरच्या डीएम आयएएस टीना दाबी यांनी बुधवारी संध्याकाळी विस्थापितांसाठी खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था केली. सुमारे 50 कुटुंबातील लोकांना जेवण उपलब्ध करून दिले आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. ज्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Latest Marathi News)

IAS Tina Dabi News
Jalgaon Cyber Crime: पन्नास– शंभर रुपयांच्या लालसेत गमावले तीन लाख; यू-ट्यूब सबस्क्रीप्शनच्या नावे लुटले

या कारवाईबद्दल बोलताना त्यांनी, मोठ्या संख्येने विस्थापित पाकिस्तानी हिंदूंनी मुख्य जमीन आणि पाणलोट क्षेत्र तसेच वाटप केलेल्या जमिनीवर कब्जा केला आहे, ज्यासाठी गेल्या एप्रिल महिन्यात कारवाई करण्यात आली होती. त्या लोकांनाही समजावले, पण त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे पुन्हा कारवाई करण्यात आली, अशी माहिती दिली आहे.

पुनर्वसनासाठी पाऊले उचलणार...

तसेच डीएम टीना दाबी (IAS Tina Dabi) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेत बेघर झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनेक पावले उचलण्यात आली आहेत. पाकिस्तानी स्थलांतरितांशीही चर्चा झाली. जिल्हा प्रशासन, यूआयटी आणि पाकिस्तानी विस्थापितांचे प्रतिनिधी यांचे संयुक्त सर्वेक्षण पथक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com