Imran Khan Arrest Video: कॉलर अन् मानेला धरलं, ढकलत ढकलत गाडीत बसवलं; इम्रान खान यांच्या अटकेचा व्हिडिओ समोर

Imran Khan arrest shocking video viral : इम्रान खान यांच्या अटकेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या पाकिस्तानी सैन्य त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवत असल्याचे दिसत आहे.
Imran Khan arrest shocking video viral
Imran Khan arrest shocking video viralsaam tv

PTI chief Imran Khan Arrest : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे नेते इम्नान खान यांना आज पाकिस्तानी निमलष्करी दलाने अचानक अटक केली. याघटनेमुळे पाकिस्तान ढवळून निघाला आहे. मंगळवारी दुपारी इस्लामाबाद उच्च न्यायालयात (IHC) एका प्रकरणातील सुनावणीसाठी इम्रान खान उपस्थित राहणार होते.

परंतु कोर्टाच्या आवाहात येताच त्यांना पाकिस्तानी निमलष्करी दलाने ताब्यात घेतले. यानंतर पीटीआयकडून अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पीटीआयच्या नेत्या मुसरत चीमा यांनी ट्विटरवर एका व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी म्हटले की, “ते (पाकिस्तानी निमलष्करी दल) सध्या इम्रान खानचा छळ करत आहेत, ते खान साहेबांना मारहाण करत आहेत. त्यांनी खान साहेबांसोबत काहीतरी केले आहे, असा आरोप देखील चीमा यांनी केला आहे.

Imran Khan arrest shocking video viral
Imran Khan Arrested: इम्रान खान यांना का अटक केली? इस्लामाबाद हायकोर्टाचा सवाल; पंतप्रधानांना समन्स बजावण्याचा इशारा

तसेच पीटीआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून इम्रान खान यांच्या वकिलाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात ते वकील आयएचसीच्या बाहेर जखमी अवस्थेत दिसत आहे. पीटीआयने ते गंभीर जखमी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान पीटीआयच्या या आरोपांनंतर इम्रान खान यांच्या अटकेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या पाकिस्तानी सैन्य त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवत असल्याचे दिसत आहे.

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इम्रान खान इस्लामाबाद हायकोर्टाच्या गेटमध्ये प्रवेश करण्याआधीच रेंजर्सनी कोर्ट परिसरातून त्यांना ताब्यात घेतले. पीटीआयचे वकील फैसल चौधरी यांनी या घडामोडींना दुजोरा दिला आहे. पाकिस्तानातील स्थानिक वृत्तपत्र डॉन डॉट कॉमने याबाबतचे वृत्त दिले आहे. पीटीआयचे अझहर मशवानी यांनी इम्रान यांना रेंजर्सनी कोर्टाच्या आतून अपहरण केले असा आरोप केला आहे. या घटनेनंतर पीटीआयकडून देशभरात कार्यकर्त्यांना तात्काळ निदर्शने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Pakistan News)

Imran Khan arrest shocking video viral
Imran Khan arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, मारहाण आणि काहीतरी अनुचित केल्याचा PTI चा आरोप

दरम्यान, पोलिसांनी इम्रान यांना मारहाण झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. पोलिसांनी एक निवेदन जारी करून म्हटले की, इम्रान खान यांच्या कारला वेढा घातला होता, तसेच कोणावरही अत्याचार झाला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.

दरम्यान इस्लामाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आमेर फारूक यांनी इस्लामाबादचे पोलीस प्रमुख अंतर्गत मंत्रालयाचे सचिव आणि अतिरिक्त ऍटर्नी जनरल यांना १५ मिनिटांत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. IHC मुख्य न्यायाधीश म्हणाले की ते "संयम" दाखवत आहे, परंतु इस्लामाबादचे पोलिस प्रमुख न्यायालयात हजर न झाल्यास पंतप्रधानांना "समन्स" बजावण्यात येईल असा इशाराही न्यायधीशांनी दिला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com