हे काय नवं! नणंदेने केलं चक्क वहिनीसोबत लग्न

एका तरुणीनेच नवरदेवाच्या सर्व विधी पुर्ण करुन एका नवरीला घरी आणलं.
हे काय नवं! नणंदेने केलं चक्क वहिनीसोबत लग्न
Unique weddingSaam TV

मुंबई : आजपर्यंत आपण लग्नांबाबत (Marriage) अनेक गमतीदार किस्से ऐकले आहेत. कोणी वयोवृद्ध व्यक्ती लहान मुलीशी तर वयाच्या साठीत असताना बनलेली एखाद्याची जोडी असं आपण ऐकलं आहे. मात्र, एखाद्या मुलीने आपल्याच वहिनीशी लग्न केल्याची घटना कधी आपण ऐकलेली आहे का? आणि नसेल तर विश्वास ठेवा एक अशी अनोखी घटना घडली आहे. चक्क एका तरुणीनेच नवरदेवाच्या सर्व विधी पुर्ण करुन एका नवरीला घरी आणलं आणि ज्या मुलीला घरी घेऊन आली तिला आपल्या भावाकडे सोपवलं.

आता हे सर्व वाचून तुम्हाला कदाचित अंदाज आला नसेल की हे प्रकरण नेमकं काय आहे. तर ही एक सत्य घटना आहे. मात्र, या घटनेला परंपरेची जोड देखील आहे. गुजरातमधील (Gujarat) छोटा उमेपूर जिन्ह्यातील ही घटना असून या जिल्ह्यातील सुरखेडा, सनाडा आणि अंबाला या गावांमध्ये अशी अनोखी प्रथा आहे. या प्रथेनुसार येथे लग्न करण्यासाठी नवरदेव जात नाही, तर त्या नवरदेवाची बहिणच नवरदेव बनून जाते आणि आपल्या भावाच्या बायकोशी म्हणजेच वहिनीसोबत लग्न करते आणि तिची पाठवणी करुन घरी आणते व नंतर त्या वहिनीला भावाकडे सोपवते.

हे देखील पाहा -

अशीच घटना या तीन गावांपैकी एक असणाऱ्या अंबालामध्ये हिरसिंग रायसिंग राठवा यांचा मुलगा नरेश यांचे लग्न बजलिया राठवा यांच्या मुलीशी जमलं. त्यानंतर वर पक्षांकडून आपल्या आराध्य दैवतामुळे निर्माण झालेल्या प्रथेबद्दल वधू पक्षातील व्यक्तीना सांगण्यात आलं. तेव्हा मुलीकडचे देखील या प्रथेनुसार विवाह करण्यास तयार झाले. शिवाय या गावांमध्ये अशा पद्धतीने लग्न केलं नसल्याने तीन कुटुंबातील तीन मुलांचा काही कारणाने मृत्यू झाल्याचंचही सांगितलं जातं. त्यामुळे या जुन्या परंपरेने या गावांमध्ये आजही विवाह पार पडतात.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.