Corona In Delhi: दिल्लीतील सर्व खाजगी कार्यालये बंद; कडक निर्बंध लागू

दिल्लीतील कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन केजरीवाल सरकारकडून (Kejriwal Government) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता दिल्लीतील सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील आणि सर्व कर्मचारी घरून काम करतील.
Corona In Delhi
Corona In DelhiSaam Tv

दिल्ली : कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढू नये यासाठी राज नियमावली लागू करत आहे. महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीत (Delhi) कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन कडक निर्बंध वाढवण्यात आले आहेत. सुधारित नियमानुसार, आता दिल्लीतील सर्व खाजगी कार्यालये पूर्णपणे बंद करण्याचे आदेश आले आहेत. सर्व कर्मचारी घरून काम करतील म्हणजेच Work From Home करतील. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (DDMA) हा आदेश दिला आहे. सध्या खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू होती आणि 50 टक्के कर्मचारी कार्यालयात जात असत. (Delhi Corona Latest news in marathi)

अधिक कडक निर्बंध;

डीडीएमएनेही अधिक कडक निर्बंध लादले आहेत. या आदेशानुसार दिल्लीतील सर्व रेस्टॉरंट आणि बारही बंद करण्यात आले आहेत. आता रेस्टॉरंटमधून घरपोच डिलिव्हरी आणि खाद्यपदार्थ घेऊन जाण्याची सुविधा असेल. आतापर्यंत रेस्टॉरंट आणि बार देखील 50% क्षमतेने सुरू होते. कार्यालयांबद्दल बोलायचे तर, केवळ सूट श्रेणी/अत्यावश्यक सेवांच्या खाजगी कार्यालयांना या नियमातून सूट दिली गेली आहे.

वास्तविक, देशात आणि राजधानी दिल्लीतही कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. भारतात गेल्या 24 तासात कोरोनाची 1,68,063 नवीन प्रकरणे समोर आली असून, कोरोनामुळे 277 लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारच्या तुलनेत हा आकडा कमी आहे तरीही ही परिस्थिती चिंताजनकच आहे. (Latest News on delhi lockdown)

Corona In Delhi
Science Miracle: डुकराच्या हृदयाचे मानवी शरीरात प्रत्यारोपण; रुग्णाची स्थिती कशी?

दिल्लीची कोरोना आकडेवारी;

राजधानी दिल्लीच्या कोविड आकडेवारीनुसार, सोमवारी 19166 नवीन कोविड रुग्ण आढळून आले होते तर 17 रुग्णांचा मृत्यू झाला होता. दिल्लीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 25 टक्क्यांवर पोहोचले आहे. येथे तपासणी करणाऱ्या प्रत्येक चौथ्या व्यक्तीला कोरोनाची लागण होत आहे. 5 मे 2021 नंतर संसर्गाचे प्रमाण आत्ता सर्वाधिक वाढले आहे.

हे देखील पहा-

दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्र आणि मुंबईतील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 33,470 नवे रुग्ण आढळून आले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 13,648 प्रकरणे फक्त मुंबईत आढळून आली आहेत. तेथे कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com