काय सांगता! कपाटात सापडले 550 कोटी रुपये ,आयकर विभागाचा छापा...

हैदराबाद या ठिकाणी एका नामांकित फार्मास्युटिकल कंपनीवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली
काय सांगता! कपाटात सापडले 550 कोटी रुपये ,आयकर विभागाचा छापा...
काय सांगता! कपाटात सापडले 550 कोटी रुपये ,आयकर विभागाचा छापा... Saam Tv

हैदराबाद : हैदराबाद या ठिकाणी एका नामांकित फार्मास्युटिकल कंपनीवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. त्यावेळेस त्याठिकाणी झालेला प्रकार पाहून आयकर विभागाचे अधिकारी देखील चांगलेच चक्रावले आहेत. कारण कार्यालयात चक्क ५५० कोटी सापडले आहेत. नेमका प्रकार काय? सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सयाच्या मतानुसार, आयकर विभागाने ६ ऑक्टोबर दिवशी हेटेरो फार्मास्यूटिकल ग्रुपवर नुकतीच छापेमारी करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

या छापेमारी दरम्यान आयकर विभागाचे अधिकारी देखील चांगलेच चक्रावले आहेत. कारण, हेटेरो फार्मास्टूटिकलच्या कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना एका कपाटात तब्बल १४२ कोटी रुपये सापडले आहेत. इतर सर्व गोष्टी मिळून आतापर्यंत सुमारे ५५० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. आयकर विभागाच्या छाप्यावेळी खात्यांची पुस्तके आणि रोख रक्कम सापडली आहे. डिजिटल उपकरणे, पेन ड्राईव्ह, अनेक कागदपत्रे या छापेमारीत जप्त करण्यात आली आहेत. या छापेमारी वेळी अनेक बनावट आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून करण्यात आलेल्या खरेदीबाबत मोठा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

काय सांगता! कपाटात सापडले 550 कोटी रुपये ,आयकर विभागाचा छापा...
महाराष्ट्र बंदचा मुंबईत उडाला फज्जा: अतुल भातखळकर

याचबरोबर, जमीन खरेदीकरिता पैसे भरल्याचा पुरावाही सापडला आहे. त्यामध्ये कंपनीच्या पुस्तकांमधील वैयक्तिक खर्च आणि संबंधित सरकारी नोंदणी मूल्याच्या खाली खरेदी केलेली जमीन, याचा यामध्ये समावेश आहे. अधिकारी म्हणाले की, तपासादरम्यान अनेक बँक लॉकर देखील सापडले आहेत. त्यापैकी १६ लॉकर चालवले जात आहेत. अघोषित उत्पन्न शोधण्याकरिता आयकर विभागाकडून पुढील तपास करण्यात येत आहे. ही कंपनी आपल्या अधिकाधिक उत्पादनांची निर्यात विदेशात करत आहेत. त्यामध्ये USA, यूरोप, दुबई आणि अन्य आफ्रिकी देशांचा समावेश आहे. आयकर विभागाने ६ राज्यात जवळपास ५० ठिकाणी तपासणी मोहीम राबवली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.