आनंददायक! अमेरिकेमधून भारतासाठी प्रवास नियमावलीत शिथिलता

भारतामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत आकडेवारीत घट होताना दिसून येत आहे.
आनंददायक! अमेरिकेमधून भारतासाठी प्रवास नियमावलीत शिथिलता
आनंददायक! अमेरिकेमधून भारतासाठी प्रवास नियमावलीत शिथिलता Saam Tv

वॉशिग्टन : भारतामध्ये India कोरोना Corona रुग्णांच्या संख्येत आकडेवारीत घट होताना दिसून येत आहे. अमेरिकेन American भारताकरिता ट्रॅव्हल अँन्ड व्हायझरीमध्ये बदल करण्यात आले आहे. भारत देशाला आता स्टेज ४ मधून स्टेज ३ मध्ये अपग्रेड करण्यात आले आहे. लेवल ३ नुसार प्रवासावरती पुनर्विचार करण्यास सांगण्यात आले आहे, तर लेव्हल ४ नुसार प्रवासावर बंदी देखील आणली गेली होती.

सीडीसीने CDC भारताकरिता लेव्हल ३ ची ट्रॅव्हल हेल्थ नोटिस जारी करण्यात आली आहे. सीडीसीने म्हटले आहे की, एफडीएकडून FDA मंजुर मिळालेल्या लशीचा Vaccine डोस घेतले असेल, तर कोरोना विषाणूचे लक्षणे निर्माण होण्याची शक्यता कमी प्रमाणात असते. यामुळे महत्त्वाचे असेल, तर तुम्ही प्रवास करु शकणार आहे. पण, त्याअगोदर सीडीसीने जारी करण्यात आलेले नियम नक्की वाचावे.

हे देखील पहा-

सीडीसीने लोकांना सल्ला दिला आहे की, लेव्हल ३ मध्ये असलेल्या देशांनी प्रवास करण्याअगोदर पुनर्विचार करावा लागणार आहे. देशात येणार असाल, तर लस घेणे बंधनकारक आहे. भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यावर अमेरिकेन भारताला लेव्हल ४ मध्ये टाकले होते. यामुळे अमेरिकेमधील प्रवासावर निर्बंध आणले होते. भारतात कोरोना महामारीच्या दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

देशामध्ये रोज ५० हजारांच्या घरात कोरोना रुग्णसंख्या आढळत आहे. मागील काही दिवसांअगोदर देशामध्ये ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळून आले होते. यामुळे जगभरात अनेक देशांत भारतीय नागरिकांना देशामध्ये येण्यास सक्त बंदी घातली होती. आता दुसरी लाट ओसरली आहे. भारतामधील रुग्णसंख्येत घट होताना दिसून येत आहे.

आनंददायक! अमेरिकेमधून भारतासाठी प्रवास नियमावलीत शिथिलता
पर्यावरण बचावासाठी प्रणालीचा 9,500 किमीचा प्रवास

अनेक देशांनी भारतामधील नागरिकांच्या प्रवासावर असलेली बंदी आता उठवली आहे. युरोपामध्ये जवळपास १५ देशांनी कोविशिल्ड लशीचा डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. देशात ३० हजार ९३ नवीन रुग्ण संख्येत भर पडली आहे, तर ४५ हजार २५४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाले आहेत. या कालावधीतच ३७४ रुग्णांचा मृत्यू देखील झाले आहे. मागील काही दिवसांपासून मृताची संख्येमध्येही मोठी घट बघायला मिळाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com