भारत-चीन सैन्य कमांडर्सची13 व्या फेरीची चर्चा आज; सैन्य मागे घेण्यावर दिला जाणार भर

एलएसीच्या चीनचा भाग असलेल्या मोल्डोत आज सकाळी चर्चेला सुरूवात होणार
भारत-चीन सैन्य कमांडर्सची13 व्या फेरीची चर्चा आज; सैन्य मागे घेण्यावर दिला जाणार भर
भारत-चीन सैन्य कमांडर्सची13 व्या फेरीची चर्चा आज; सैन्य मागे घेण्यावर दिला जाणार भरSaam Tv

वृत्तसंस्था : भारत आणि चीन यांच्यात कोर कमांडर स्तरावर आज चर्चेची १३ वी फेरी होणार आहे. एलएसीच्या चीनचा भाग असलेल्या मोल्डोत आज सकाळी चर्चेला सुरूवात होणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व लेह या ठिकाणी XIV कोरचे कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन हे करणार आहेत. दक्षिण शिनजियांग मिलिटरी जिल्ह्याचे कमांडर मेजर जनरल लियू लिन चीनचे नेतृत्व करणार आहेत. लडाख सीमेवर दोन्ही देशांतील लष्करी वाद खूप दिवसांपासून सुरू आहे. असे मानले जाते की आजच्या संभाषणात हॉट स्प्रिंगमध्ये तैनात सैनिकांच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे.

हे देखील पहा-

दोन्ही पक्षात लष्करी स्तरावर चर्चेच्या आतापर्यंत १२ फेऱ्या झाले आहेत, परंतु आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेसा नाही. शनिवारी सायंकाळी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे म्हणाले की, चीन आपल्या क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. म्हणजे तो इथे खूप काळ राहणार आहे. नरवणे असे देखील म्हणाले की, दोन्ही देश एलएसीच्या पश्चिम भागात पायाभूत सुविधा विकसित करणार आहेत. जे मागील वर्षी आणलेल्या अतिरिक्त सैन्य आणि लष्करी उपकरणांच्या सुविधेकरिता बनवले जात आहे.

भारत-चीन सैन्य कमांडर्सची13 व्या फेरीची चर्चा आज; सैन्य मागे घेण्यावर दिला जाणार भर
धुळ्यात ब्राऊन शुगर सापडल्याने खळबळ; आय जी पथक आणि मोहाडी पोलिसांची कारवाई

मागील आठवड्यात पूर्व लडाखच्या दौऱ्या दरम्यान अशा प्रकारचे भाष्य केले होते. पैंगोंग त्सो आणि गोगरा पोस्टच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावर असलेले सैन्य मागे हटले आहे. परंतु, ते हॉट स्प्रिंग्सवर तैनात आहेत. मे २०२० मध्ये चीनने एलएसी ओलांडल्यापासून या ठिकाणी सैन्य एकमेकांना सामोरे जात आहेत. चिनी भारतीय सैनिकांना चीनी हे डेपसंग मैदानाच्या ट्रेडिशनल पेट्रोलिंग पॉइंट्सवर जाण्यापासून अडवत आहेत. काराकोरम खिंडीजवळ दौलत बेग ओल्डी या ठिकाणी असलेल्या रणनीतिक भारतीय चौकीपासून हे क्षेत्र खूप दूर नाही.

केवळ लडाखमध्ये नाही तर अरुणाचल प्रदेशामध्ये देखील चीन आपल्या कुरापती रोखत नाही. मागील आठवड्यात अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये भारतीय सैनिकांची चिनी सैनिकांशी चकमक झाली आहे. गस्तीदरम्यान दोन्ही देशांचे सैनिक सीमा वादावर समोरासमोर आले होते आणि ही प्रक्रिया काही तास चांगलीच चाली होती. मात्र, यामध्ये भारतीय सैनिकांचे कोणतेही नुकसान झाले नाही आणि प्रोटोकॉलनुसार चर्चेद्वारे वाद मिटवण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.