India Corona Update: देशात 24 तासात 17,073 नवे कोरोना रुग्ण, 25 जणांचा मृत्यू

देशात सध्या 94,420 इतके कोरोना रुग्ण सक्रिय आहेत.
India Corona Cases
India Corona CasesSaam Tv

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना (Corona) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दैनंदिन कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. देशभरात कोरोनाच्या नवीन रुग्णात लक्षणीय वाढ झाली. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे तब्बल 17,073 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 4,34,07,046 वर पोहोचली आहे. तर, गेल्या 24 तासात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या साथीच्या आजाराने मृतांची संख्या 5,25,020 वर गेली आहे. देशात सध्या 94,420 इतके कोरोना रुग्ण सक्रिय आहेत.

हे देखील पाहा -

देशात महाराष्ट्र (Maharashtra) आणि दिल्लीमध्ये (Delhi) गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

India Corona Cases
एकनाथ शिंदे गटातील कोणत्या आमदारांना मंत्रीपद मिळणार? यादी आली समोर

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात आज 6,493 कोरोनाच्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा एकूण आकडा 24,608 वर गेला आहे. तर आज दिवसभरात कोरोनाच्या पाच रुग्णांचा मृत्यू (corona deaths) झाला असून कोरोना मृतांची एकूण संख्या 1,47,905 वर पोहोचली आहे. राज्यात दिवसभरात कोरोनाच्या 6,213 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 77,90,153 एवढी झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 97.83 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com