India Corona Update: कोरोनाचा वेग मंदावला! देशातील रुग्णांत होतेय घट; नव्याने आढळले 6,660 रुग्ण

Latest News: हा आकडा गेल्या काही दिवसांपासून नोंद होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत कमी आहे.
India Corona Update
India Corona UpdateSaam Tv

Delhi News: देशात कोरोनाने (Corona Virus) पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशातील कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या दिवसेंदिवस वाढ चालली असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या आकड्यात घट होत असल्याचे चित्र पाहायाला मिळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 6 हजारांपेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा गेल्या काही दिवसांपासून नोंद होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत कमी आहे.

India Corona Update
Ramdas Kadam News : रामदास कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मुलांविरोधात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या नवीन आकडेवारीनुसार, भारतामध्ये गेल्या 24 तासांत 6,660 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 9,213 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महत्वाचे म्हणजे देशातील सक्रीय रुग्णांचा आकडा कमी होत तो 63,380 ऐवढा झाला आहे. तर, सोमवारी देशातील सक्रीय कोरोना रुग्णांचा आकडा 65,683 इतका होता.

महत्वाचे म्हणजे, सोमवारी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार 7,178 नवीन प्रकरणांची नोंद झाली होती. त्या तुलनेत आजचा कोरोना रुग्णांचा आकडा लक्षात घेतला तर देशातील कोरोना रुग्णांच्या आकड्यात बऱ्यापैकी घट झाल्याचे दिसून येत आहे. ही सर्वांसाठी दिलासा देणारी बाब आहे. देशामध्ये जे कोरोना रुग्ण आढळत आहेत त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. तर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे.

India Corona Update
Plane Catches Fire : भयंकर! पक्षाची धडक लागल्याने विमानाने घेतला पेट; १६९ प्रवाशी करत होते प्रवास, पुढे काय घडलं?

कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारने सतर्क होत उपाययोजना करण्यास सुरुवात केली. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आणि वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारने नागरिकांना मास्कचा वापर अनिवार्य केला. तसंच ज्यांनी अद्याप कोरोनाची लस घेतली नसेल त्यांनी तात्काळ लस घ्यावी असे आवाहन सरकारने केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com