Coronavirus Update: चिंता वाढली! देशात गेल्या 24 तासांत 10,112 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; सक्रीय रुग्णांचा आकडा 67 हजार पार

Latest News: गेल्या काही दिवसांपासून दिवसांला 10 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण समोर येत आहेत.
Coronavirus Updates
Coronavirus Updates Saam Tv

Delhi News: देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसांला 10 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण समोर येत आहेत. यासोबत कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) मृतांचा आकडा देखील वाढत आहे. गेल्या 24 तासांत 10 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. अशामध्ये देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 67 हजार पार झाली आहे.

Coronavirus Updates
Uddhav Thackeray Jalgaon Sabha: जळगावात आज ठाकरी तोफ धडाडणार! सभेत गुलाबरावांचे मुखवटे घालून येऊ, शिवसेनेचा इशारा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, देशामध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेले 10,112 नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 67,806 वर पोहोचली आहे. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या (Corona Patient) लक्षात घेता सरकारसोबतच सर्वांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Coronavirus Updates
Arshdeep Singh Wickets: अर्शदीप सिंगने तोडलेल्या LED स्टंपची किंमत ऐकूण बसेल धक्का! BCCIचं लाखोंचं नुकसान

आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय कोरोना रिकव्हरी रेट 98.66 टक्के आहे. कोरोनापासून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,42,83,021 वर पोहोचली आहे, तर डेट रेट 1.18 टक्के झाला आहे. तर देशभरातील जनतेला कोरोनावरील लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.

Coronavirus Updates
Delta Airlines: मद्यधुंद प्रवाशाने विमानात पुरुष अटेंडंटला बळजबरीने केलं Kiss, म्हणाला...तू खूप सुंदर आहेस...

अशामध्ये, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरातील सर्व राज्य सरकारने कंबर कसली असून उपययोजना करण्यास सुरुवात केली आहे. अनेक राज्यांमध्ये सध्या मास्कचा वापर करणे अनिवार्य केला आहे. त्याचसोबत नागरिकांनी स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com