India vs Bharat: 'इंडिया' नाही 'भारत' च पण, भारत कसा बनला होता इंडिया, जाणून सर्व कहाणी

Bharat vs India: G-20 शिखर परिषदेदरम्यान राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) झालेल्या डिनरच्या निमंत्रण पत्रिकेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारत हा शब्द आणि त्याच्या अर्थाची देशभरात जोरदार चर्चा होतेय.
India vs Bharat: 'इंडिया' नाही 'भारत' च पण, भारत कसा बनला होता इंडिया, जाणून सर्व कहाणी
Saam Tv

Bharat vs India:

G-20 शिखर परिषदेदरम्यान राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) झालेल्या डिनरच्या निमंत्रण पत्रिकेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारत हा शब्द आणि त्याच्या अर्थाची देशभरात जोरदार चर्चा होतेय. आता सोशल मीडियावर भारताला 'इंडिया' (india) हे नाव कसं मिळालं याची चर्चा होतेय.

देशाचं नाव बदलण्यावरून मोठी चर्चा सुरूय. संविधानात लिहिलेलं 'इंडिया दॅट इज भारत' ला बदलून फक्त भारत करण्याची मागणी केली जातेय. संविधानाच्या इंग्रजी आवृत्तीत 'इंडिया' नावाचा वापर करण्यात आलाय. तर संविधानाच्या हिंदी आवृत्तीमध्ये 'भारत' नावाचा वापर करण्यात आलाय. परंतु भारताला 'इंडिया' हे नाव कसं मिळालं हे जाणून घेऊ. (Latest News on India).

दरम्यान प्राचीन काळापासून भारतभूमीला जांबुद्वीप, आर्यावर्त, भारतखंड, हिमवर्ष, अजनभावर्ष, भारतवर्ष, हिंद, हिंदुस्थान आणि भारत अशी वेगवेगळी नावे आहेत. पण त्यांपैकी 'इंडिया' सर्वाधिक वैध आणि लोकप्रिय ठरलं. भारताच्या नामकरणाबाबत अनेक समज आणि मतभेद आहेत. परंतु भारताला वैविध्यपूर्ण संस्कृतीप्रमाणे आपल्या देशाला वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळी नावे मिळाली आहेत.

India vs Bharat: 'इंडिया' नाही 'भारत' च पण, भारत कसा बनला होता इंडिया, जाणून सर्व कहाणी
One Nation One Election: 'एक देश-एक निवडणूक'साठी उच्चस्तरीय समिती स्थापन; अमित शाह, अधीर रंजन यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश

'भारत' या नावाची मुळं प्राचीन आहेत. भारतीय उपखंडाचे वर्णन करण्यासाठी शतकानुशतके भारतीय ग्रंथ आणि लोककथांमध्ये वापरली जात आहेत. भारत या शब्दाच्या उत्पत्तीविषयी सांगितलं जातं की, महाराज भरत यांच्या नावावरून देशाचे नाव भारत ठेवण्यात आलं. म्हणजेच महाभारतासारख्या हिंदू महाकाव्यांमध्ये वर्णिलेल्या महान सम्राट भरताशी याचा संबंध आहे. मध्ययुगीन काळात सिंधू खोऱ्यातून तुर्क आणि इराणी लोक भारतात दाखल झाले. ते 'एस' चा उच्चार ह करायचे. या सिद्धांतानुसार तुर्कांनी भारतातील लोकांना हिंदू म्हटलं.

अशाप्रकारे हिंदूंच्या देशाला हिंदुस्थान हे नाव पडलं. त्याचवेळी दुसरा सिद्धांत असा की, त्यावेळी इंग्रज भारतात आले. त्यांना देशाला हिंदुस्थान नावाचा उच्चार करता येत नव्हता. त्यामुळे ब्रिटिश वसाहतीच्या काळात इंग्रज संपूर्ण भारतीय उपखंडाला भारत म्हणत असायचे. जेव्हा १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्राचे अधिकृत नाव म्हणून कोणते नाव स्वीकारायचं हा प्रश्न नेत्यांसमोर होता. भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी या विषयावर चर्चा केली.

India vs Bharat: 'इंडिया' नाही 'भारत' च पण, भारत कसा बनला होता इंडिया, जाणून सर्व कहाणी
One Nation, One Election: कायदा मंडळानं मागितला तपशील; निवडणूक आयोगानं मांडला खर्च; EVMS अन् VVPATS साठी लागणार ८ हजार कोटी

भारताची भाषिक आणि सांस्कृतिक विविधता लक्षात घेता राज्यघटनेत 'भारत' आणि 'भारत' या दोन्ही शब्दांचा वापर करण्याचा निर्णय घेतला. भारतीय राज्यघटनेच्या कलम १ मध्ये म्हटलं की, 'इंडिया, म्हणजेच भारत आहे, हे राज्यांचा संघ' असेल. या करारात दोन्ही नावांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व मान्य करण्यात आलं.

गेल्या काही वर्षांत 'इंडिया' हे सामान्यपणे वापरले जाणारे नाव बनलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे नाव सहजपणे ओळखले जाऊ लागले. तर दुसरीकडे हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये 'भारत'चा वापर सुरूच राहिला.हिंदी आणि इंग्रजी ही भारताची अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आल्या. तसेच हिंदी ही भारत सरकारची अधिकृत भाषा होती. यामुळे 'इंडिया'बरोबरच 'भारत'नावाचा ही वापर सुरू राहिला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com