UN Population Report: चीनला मागे टाकून भारत लोकसंख्येमध्ये पहिल्या क्रमांकावर, जाणून घ्या आता किती झाली लोकसंख्या?

India Overtakes China As World Most Population Country: संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार, भारताच्या लोकसंख्येत वाढ झाली असून चीनलाही मागे टाकलं आहे.
UN Population Report
UN Population ReportSaam tv

Population of India: संयुक्त राष्ट्रसंघाने लोकसंख्येची आकडेवारी जारी केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार, भारताच्या लोकसंख्येत वाढ झाली असून चीनलाही मागे टाकलं आहे. जगातली सर्वाधिक लोकसंख्या ही भारतात असल्याची नोंद करण्यात आली आहे. एकीकडे वाढती लोकसंख्या ही विकासातला प्रमुख अडथळा मानला जात असतानाच, डोकेदुखी वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. (Latest Marathi News)

लोकसंख्येच्या बाबतीत भारत आता चीनच्याही पुढे

चीनच्या तुलनेत भारतात तब्बल 30 लाख लोक जास्त असल्याची आकडेवारी समोर आली आहे.भारताच्या लोकसंख्येत फक्त एका वर्षात 1.56% वाढ झाली आहे. भारत हा आता जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे.

युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या रिपोर्टमध्ये भारताच्या लोकसंख्येची आकडेवारी जारी करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार भारतातील लोकसंख्या चीनपेक्षा तब्बल 30 लाखांनी जास्त असल्याचं समोर आलंय.

UN Population Report
Karnataka BJP Leader Killed: भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ, कर्नाटकात निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापलं

लोकसंख्येत भारताचा पहिला नंबर!

युनायटेड नेशन्सच्या अहवालानुसार, भारताची लोकसंख्या आता 142 कोटी 86 लाख इतकी झाली आहे. तर चीनची लोकसंख्या 142 कोटी 57 लाख इतकी झाली आहे .अवघ्या एका वर्षात भारतात चक्क 1.56% लोकसंख्या वाढ झाली आहे. अहवालानुसार, भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.

भारतातील 25 टक्के लोकसंख्येचं वय 14 वर्षांपेक्षा कमी आहे. तर 10 ते 19 वर्ष वय असलेले 18 टक्के लोक भारतात आहेत. भारतात 10 ते 24 वय असलेले 24% लोक भारतात आहेत. तर 15 ते 64 वय असलेले 68% लोक देशात आहेत.

चीनच्या तुलनेत भारताची लोकसंख्या जास्त असली तर भारत हा चीनपेक्षा तरुण आहे, असं लोकसंख्येच्या आकडेवारीवरुन तरी दिसतंय. कारण चीनमध्ये 20 कोटी लोकांचं वय हे 65 पेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे.

एकीकडे भारताची लोकसंख्या वाढल्याचं समोर आलं आहे. तर दुसरीकडे गेल्या वर्षी चीनच्या लोकसंख्येत घट झाल्याचीही नोंद करण्यात आलेली. चीनमध्ये गेल्या वर्षी 8 लाख इतकी घट लोकसंख्येत नोंदवण्यात आलेली. तर दुसरीकडे भारताच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.

लोकसंख्या आणि इंटरेस्टिंग आकडेवारी!

1981 साली भारतात पहिल्यांदा जनगणना करण्यात आली होती. 1981 साली भारताची लोकसंख्या 25.38 कोटी होती. दर 10 वर्षांची भारतात जनगणना केली जाते. 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी इतकी आहे. 2021 साली जनगणना होणं अपेक्षित होतं, पण कोरोनामुळे जनगणना होऊ शकली नाही.

संयुक्त राष्ट्र संघाच्या अंदाजानुसार, 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 166 कोटी होईल. भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकलं. भारतातील सर्वाधिक लोक हे तरुण आहे, या दोन गोष्टी जरी जमेच्या असल्या, तरी एका बाबतीत चीन अजूनही पुढे आहे.

भारतातील लोकांचं सरासरी वय हे चीनपेक्षा कमी आहे. भारतातील पुरुषांचं सरासरी वय हे 74 आहे तर चीनमध्ये हेच वय 76 वर्ष आहे. तर महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर चीनमधील महिलांचं सरासरी वय 82 वर्ष असून भारतातील महिलांचं सरासरी वय ते 71 वर्ष असल्याचीही आकडेवारी समोर आली आहे.

भारताच्या वाढलेल्या लोकसंख्येची ही आकडेवारी युनायडेच नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या अहवालातून समोर आलीय. या अहवालातून भारताने चीनला मागे टाकल्याचं अधोरेखित झालंय खरं. पण आता विकासाच्या बाबतीत हीच वाढलेली लोकसंख्या डोकेदुखी तर ठरणार नाही ना, असा प्रश्नही उपस्थित होतोय.

UN Population Report
Viral Note: 'विशाल, मला २६ एप्रिलच्या आधी पळवून ने, कारण...'; गर्लफ्रेंडचा १० रुपयांच्या नोटेवर बॉयफ्रेंडला मेसेज

'हम दो हमारे दो' असा नारा लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आणि कुटुंब नियोजनासाठी देण्यात आला खरा. पण आता हाच नारा बदलून येत्या दिवसात हम दो हमारा एक असा केला गेला, तर आश्चर्य वाटायला नको.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com