देशात कोरोनाचा पुन्हा उद्रेक! गेल्या २४ तासांत आढळली मोठी रुग्णसंख्या; ६७ मृत्यू

गेल्या 24 तासांत 67 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.
Covid 19 Cases In India, Coronavirus In India Updates, Coronavirus News
Covid 19 Cases In India, Coronavirus In India Updates, Coronavirus NewsSAAM TV

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा (Corona) वाढता प्रादुर्भाव काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. अशीच परिस्थिती शुक्रवारी दिवसभरातील आहे. गेल्या 24 तासांत देशात 21,411 नवीन कोविड-19 रुग्णांची (corona new patients) नोंद झाली आहे. यादरम्यान, 67 जणांचा मृत्यूही झालाय. (Corona Cases In India)

Covid 19 Cases In India, Coronavirus In India Updates, Coronavirus News
चिंताजनक! पुण्यात ओमिक्रॉन BA.5 सब-व्हेरियंटच्या 2 रुग्णांची नोंद

गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी देशात कमी रुग्ण आढळून आले असले, तरी मृतांच्या आकड्यात मात्र वाढ झाली आहे. गुरूवारी देशात कोरोनाचे 21 हजार 880 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 60 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. दरम्यान, देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची एकूण संख्या आता 4,38,68,476 वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनामुळे आतापर्यंत 5,25,997 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1,50,100 आहे. गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णांमध्ये 618 ची वाढ झाली आहे. (Corona Cases In Maharastra)

Covid 19 Cases In India, Coronavirus In India Updates, Coronavirus News
शिवसेना खरी कोणाची? निवडणूक आयोग करणार फैसला; दोन्ही गटांना दिले आदेश

याच कालावधीत 20,726 लोक कोरोना संसर्गापासून मुक्त झाले आहेत. यासह, देशातील कोरोनामधून बरे झालेल्या लोकांची संख्या आता 40,31,92,389 झाली आहे. भारताचा कोविड-19 रिकव्हरी रेट 98.46 टक्के आहे. दैनिक सकारात्मकता दर 4.46 टक्के आहे.

सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात

गेल्या 24 तासात कोरोना संसर्गाची सर्वाधिक प्रकरणे नोंदवणाऱ्या पहिल्या 5 राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे 2 हजार 515 रुग्ण आढळून आले आहे. त्यानंतर केरळमध्ये 2 हजार 477, पश्चिम बंगालमध्ये 2,237, तामिळनाडूमध्ये 2,033 आणि कर्नाटकमध्ये 1,562 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com